आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराला दुर्गंधी येत असल्याने अनेकांना लज्जित व्हावे लागते. असे प्रसंग टाळायचे असतील तर या समस्येवर काही घरगुती उपाय हे परिणामकारक ठरतात. खूप घाम येणे हे या समस्येचे कारण मानले जाते. परंतु, हे सत्य नसून घामाच्या अतिसंवेदनशील ग्रंथींमुळे शरीराला दुर्गंधी येते. उष्ण, दमट वातावरणात शरीरावर वेगाने वाढणारे जीवाणू आणि घाम यांच्या मिश्रणातून हा दर्प तयार होतो.
उपाय १
एक टेबलस्पून लिंबाचा रस १ टेबलस्पून बेकिंग सोड्यात मिसळून हे मिश्रण काखेत तसेच शरीरावरील अधिक घाम येत असलेल्या भागांवर लावा. पंधरा मिनिटे हे मिश्रण तसेच राहु द्या. नंतर थंड पाण्याने धुऊन टाका. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा.
उपाय २
आंघोळीच्या पाण्यात टी ट्री इसेंशियल ऑइलचे ३-४ थेंब टाका आणि या पाण्याने आंघोळ करा.
उपाय ३
टी ट्री इसेंशियल ऑइलचे २-३ थेंब २ टेबलस्पून पाण्यात टाकून हे मिश्रण जास्त घाम येत असलेल्या भागांवर लावा.
हे लक्षात ठेवा
१) दररोज आंघोळ करा.
२) स्वच्छ सुती कपडे वापरा.
३) प्रत्येक वेळी स्वच्छ कपडे घाला.
४) रसायनेमिश्रित साबण अथवा डिओडड्ढंट टाळा.
५) बंदिस्त पादत्राणे टाळा.
६) भरपूर पाणी प्या.
७) अतिरिक्त धूम्रपान, कॅफेन, मद्यपान, लसूण, कांदा, मसाले टाळा.
८) घाम येत असलेल्या भागावरचे केस नियमितपणे काढा.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)