आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एखाद्या अवयवाची नस चढल्यास संबंधीत व्यक्तीला खूप त्रास होतो. यावर वेळीच उपचार केला नाही तर हा त्रास वाढत जातो. शिवाय, नंतर ही समस्या बरी होण्यास वेळ लागतो. यावर काही घरगुती उपाय केल्यास लवकर आराम मिळू शकतो.
हे उपाय करा
१. काही लोकांना झोपताना अचानक नस चढल्याने त्रास सुरू होतो. यासाठी पायांच्या खाली उशी ठेवून झोपा.
२. उजव्या पायाची नस चढल्यास डाव्या हाताने कानाच्या खालील भागाला दाबा. यामुळे आराम मिळतो.
३. नस चढलेल्या ठिकाणी बर्फाने शेकल्यास आराम मिळतो.
४. अशक्तपणामुळे हा त्रास होतो. यासाठी पपई, केळी, मोसंबी, डाळिंब, सफरचंद ही फळे खावीत. पालक, टमाटर, कोशिंबर, बटाटे, गाजर याचाही आहारात नियमित समावेश करावा. सुकामेवा सुद्धा सेवन करा.
५. नस चढल्याने कधीकधी दुखते. अशावेळी कच्चे मीठ चाटल्यास आराम मिळतो.