• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

High Blood Sugar | ‘ही’ 5 लक्षणे दिसताच समजून जा की खुप वाढली आहे ब्लड शुगर, ताबडतोब लक्ष द्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 23, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
High Blood Sugar | diabetes high blood sugar warning signs symptoms of blood sugar is too high fatigue weight loss

file photo

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हाय ब्लड शुगरला (High Blood Sugar) हायपरग्लाइसेमिया देखील म्हणतात. ज्या लोकांना मधुमेह (Diabetes) आहे, अशा लोकांमध्ये ही स्थिती अधिक जाणवते. तज्ज्ञांच्या मते, हायपरग्लायसेमिया (Hhyperglycemia) टाळण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमचा मधुमेह नियंत्रित करणे. यात मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे (Early Symptoms Of Diabetes) जाणून घेणे देखील समाविष्ट आहे, मग ते कितीही किरकोळ असले तरीही. लक्षात ठेवा ही स्थिती मधुमेहावर नियंत्रण ठेवूनच टाळता येऊ शकते (High Blood Sugar).

 

हाय ब्लड शुगरमुळे (High Blood Sugar ) जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा, मळमळ आणि उलट्या, श्वासोच्छवासाचा त्रास, पोटदुखी, कोरडे तोंड यासारख्या समस्या उद्भवू शकतात. येथे आम्ही अशीच काही लक्षणे सांगत आहोत ज्यामुळे तुमची ब्लड शुगर वाढल्याचे समजते (High Blood Sugar Symptoms).

 

1. जास्त तहान लागणे (Excessive Thirst)
वाढलेली तहान आणि भूक ही ब्लड शुगरची सामान्य लक्षणे आहेत. तुम्ही दिवसभरात किती पाणी पिता किंवा खात आहात हे महत्त्वाचे नाही. जर एखाद्याला वारंवार जास्त तहान आणि भूक लागत असेल तर ते हाय ब्लड शुगरचे लक्षण असू शकते.

 

वास्तविक, जेव्हा जास्त प्रमाणात ग्लुकोज म्हणजेच साखर स्नायूंपर्यंत पोहोचते तेव्हा शरीराचे निर्जलीकरण (Dehydration) होते आणि तहान लागते. यानंतर, तुमचे शरीर रक्त पातळ करण्यासाठी आणि ग्लुकोजची पातळी (Glucose Level) कमी करण्यासाठी ऊतींमधून द्रव काढते आणि तुम्हाला तहान लागते.

 

खाल्ल्यानंतरही तुम्हाला खूप भूक लागत असेल तर याचे कारण असे की स्नायूंना आवश्यक असलेली ऊर्जा अन्नातून मिळत नाही आणि शरीराची इन्सुलिन प्रतिरोधक शक्ती ग्लुकोजला स्नायूंमध्ये प्रवेश करण्यापासून आणि ऊर्जा प्रदान करण्यास रोखते. त्यामुळे शरीराला जास्त ऊर्जा लागते आणि तुम्हाला भूक लागते.

2. यूरीनला वास येणे (Smelling Urine)
तज्ञ म्हणतात की जर एखाद्याच्या लघवीला गोड वास येत असेल तर ते तुमच्या ब्लड शुगर लेव्हल खूप वाढल्याचे लक्षण आहे. सामान्यतः, लघवीद्वारे शरीरातून उत्सर्जित होणार्‍या साखरेचे प्रमाण शोधता येत नाही. मात्र, जर एखाद्याची ब्लड शुगर लेव्हल जास्त असेल तर ती साखर किडनीद्वारे रक्तातून आणि लघवीद्वारे बाहेर पडते.

 

3. अंधुक दृष्टी (Blurred Vision)
जर तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल तर ते हायपरग्लाइसेमियाचे लक्षण असू शकते.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की काम करणार्‍या प्रत्येक 4 पैकी 1 व्यक्तीला टाईप 2 मधुमेह आहे.
मात्र त्यांना याची जाणीव नाही. एखाद्याची दृष्टी अंधुक असेल तरी ते हाय ब्लड शुगरचे लक्षण असू शकते.

 

टाईप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) असलेल्या रुग्णांना डोळ्यांचे आजार किंवा संबंधित समस्यांचा धोका वाढतो.
जसे की डायबेटिक रेटिनोपॅथी आणि डायबेटिक मॅक्युलर एडीमा.

 

4. थकवा (Fatigue)
जर एखाद्या व्यक्तीला सतत थकवा येत असेल तर ते हाय ब्लड शुगरचे लक्षण असू शकते.
यासाठी तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. तुमच्या ब्लड शुगर लेव्हलमध्ये चढ-उतार होत असते यात शंका नाही.
परंतु जेव्हा ब्लड शुगरचे प्रमाण जास्त होते तेव्हा पेशींना ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे मिळत नाहीत,
त्यामुळे पेशी नीट काम करू शकत नाहीत आणि थकवा जाणवतो.

5. वजन कमी होणे (Weight Loss)
जर एखाद्याचे वजन खूप कमी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
तज्ञांचे म्हणणे आहे की जर एखाद्याचे वजन खूप लवकर कमी झाले तर ते हाय ब्लड शुगरचे लक्षण असू शकते.
तुमचेही वजन अचानक कमी होऊ लागले असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- High Blood Sugar | diabetes high blood sugar warning signs symptoms of blood sugar is too high fatigue weight loss

 

हे देखील वाचा

 

Natural Teeth Whiteners Fruits | पाच पदार्थ आणि फळं, ज्याच्या सेवनाने तुमचे दात चमकतात

 

Sole Pain | टाचेमध्ये सुया टोचण्यासारखे वाटते का? काळजी करू नका, ‘या’ उपायांचा अवलंब करा

 

Sesame Oil Benefits | तिळाच्या तेलामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, जाणून घ्या त्याचे इतर फायदे

Tags: Blood sugarblurred visionDehydrationdiabetesEarly Symptoms Of DiabetesExcessive ThirstFatigueGlucose LevelGoogle News In Marathihealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleHhyperglycemiahigh blood sugarHigh Blood Sugar Symptomslatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on healthLifestyleSmelling Urinetodays health newsType 2 diabetesWeight lossअंधुक दृष्टीउलट्याऑक्सिजनकोरडे तोंडगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्याग्लुकोज पातळीजास्त तहान लागणेटाईप 2 मधुमेहथकवापोटदुखीपोषक तत्त्वेब्लड शुगरमधुमेहमळमळयूरीनला वास येणेवजन कमी होणेहाय ब्लड शुगरहायपरग्लाइसेमियाहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021