आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Healthy Tea | आपल्या देशात चहा पिणे एक संस्कृती बनले आहे. घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा चहा दिला जातो. बहुतांश लोक सकाळी उठल्यावर चहा पितात. हेल्थ एक्सपर्ट म्हणतात, जर चहा जास्तवेळ उकळला तर आरोग्याचे नुकसान होऊ शकते. परंतु चहा हेल्दी (Healthy Tea) पद्धतीने बनवला तर अनेक फायदे होऊ शकतात.
चहा हेल्दी बनवण्यासाठी अवलंबा या टिप्स
1. साखरेचे करा कमी सेवन
हेल्थ एक्सपर्ट सांगतात जर तुम्ही बिगर साखरेचा चहा प्यायलात तर तो जास्त हेल्दी होईल. साखरेऐवजी गुळ वापरू शकता.
2. चहा जास्त उकळवू नका
चहा जास्त उकळल्याने अॅसिडिटी व इतर समस्या होतात. चहा उकळल्यानंतर मध टाका.
3. चहापत्ती नेहमी चांगल्या दर्जाची वापरा
कारण खराब चहापत्तीची चव वाईट असतेच शिवाय आरोग्याचेही नुकसान होऊ शकते.
4. चहामध्ये दूध कमी टाका
पॅकेटऐवजी नैसर्गिक दूध निवडल्यास चहाची चव चांगली होईल, आरोग्यही उत्तम राहिल.
5. चहामध्ये करा या मसाल्यांचा वापर
चहा उकळत असताना त्यामध्ये लवंग, वेलची, आले, दालचिनी, तुळस किंवा केसर टाका. यामुळे चहा हेल्दी होतो.
6. रिकाम्यापोटी चहा पिऊ नका
हेल्थ एक्सपर्ट सांगतात रिकाम्यापोटी चहा पिऊ नका. यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. सकाळी काही खाल्ल्यानंतरच चहा प्या.
7. तुळसयुक्त चहा प्या
चहातील कॅफीन अॅसिडिक असते आणि ते झोप डिस्टर्ब करते. कॅफीनपासून बचाव करण्यासाठी तुळसयुक्त चहा प्या.
Web Title :- Healthy Tea | tips for making healthy tea know here how to make tea and its benefits
Weight Loss with Owa | ‘या’ जबरदस्त ड्रिंकमुळे काही आठवड्यातच कमी होईल वजन, गायब होईल चरबी
Complete diet | दूध पचवण्यास होत असेल समस्या? जाणून घ्या पिण्याची योग्य वेळ आणि योग्य प्रमाण
Belly Fat | पोटाची चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक फॉर्म्युला, लठ्ठपणा होईल कायमचा दूर; जाणून घ्या