आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Weight Loss with Owa | वजन कमी करणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसते. आम्ही एक असे ड्रिंक सांगणार आहोत, जे वजन कमी करण्यात उपयोगी (weight loss drink) आहे. हे ड्रिंक ओवा आणि जीरे (Owa and Cumin) यापासून तयार होते. नियमितपणे काही आठवडे हे ड्रिंक घेतल्यास काही आठवड्यातच वजन कमी होते.
जीरे आणि ओवा उपयोगी
जिर्यात अँटी-इंफ्लेमेट्री आणि अँटी-बायोटिक तत्व असते, जे शरीराची सूज कमी करते. यातील तत्व कोलेस्ट्रॉल लेव्हल सुद्धा नियंत्रणात ठेवतात. ओव्यात आयर्न, कॅल्शियम, फायबर, फॉस्फोरसशिवाय अनेक पोषकतत्व असतात. हे कॅलरी फूड आहे, यामुळे वजन कमी करता येते. यातील तत्व मेटाबॉलिक रेट स्ट्राँग करते.
असे तयार करा ड्रिंक
– एक चमचा जीरे, तेवढीच बडीसोप, एक चमचा सोडा आणि चमचाभर ओवा घ्या.
– एका भांड्यात 2 ग्लास पाणी टाकून उकळवा.
– आता या उकळत्या पाण्यात जीरे, सोडा, सोप आणि ओवा टाका.
– मिश्रण अर्धे झाल्यानंतर आचेवरून खाली उतरवा.
– मिश्रण कोमट झाल्यानंतर त्यामध्ये मध टाका.
– गाळून घ्या आणि कोमट असतानाच प्या.
– रिकाम्यापोटी याचे सेवन करू शकता.
Web Title :- Weight Loss with Owa | weight loss drink you can weight lose with ajwain
Intermittent Fasting | फास्टिंगमुळे आतड्याच्या इन्फेक्शनचा धोका कमी, जाणून घ्या काय म्हणतात एक्सपर्ट