आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Health Tips | बहुतांश लोक दिवसा आंघोळ करतात आणि काही लोकांना रात्री आंघोळ करायला आवडते. रात्री आंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा आणि तणाव कमी करणे आणि चांगली झोप घेण्यात मदत मिळते (Bathing at night helps reduce fatigue and stress throughout the day and helps you sleep better). संशोधक रात्री आंघोळ करण्याचा सल्ला देतात. कारण रात्री आंघोळ केल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी लाभ होतात (bathing at night has many health benefits for the body). कसे ते जाणून घेवूयात (Health Tips)…
चांगल्या झोपेसाठी मदत (Help for better sleep)
सायंकाळी स्नान केल्याने शरीर आणि मेंदूला आराम मिळतो. यामुळे चांगली झोप येते. झोपण्यापूर्वी 90 मिनिटे अगोदर गरम पाण्याने आंघोळ केल्याने सामन्यपेक्षा जवळपास 10 मिनिटे लवकर झोप येते. कारण गरम पाणी शरीराचे तापमान थोडे कमी करते, यामुळे शरीराला संकेत मिळतो की, झोपण्याची वेळ झाली आहे.
त्वचेसाठी चांगले (Good for the skin)
झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने मुरूमे येत नाहीत. दिवसभर केसावर बॅक्टेरिया आणि इतर मळ केसावर जमतो, झोपल्यानंतर हे सर्व उशी आणि इतर अंथरूणाला लागते आणि पुन्हा चेहर्याला लागते. कारण झोपल्यानंतर त्वचा पुन्हा जिवंत होते.
हंगामी अॅलर्जीपासून होतो बचाव (Prevents seasonal allergies)
पराग आणि धुळीसारखी अॅलर्जी त्वचा आणि कपड्यांवर पडते, आणि झोपल्यावर हे सर्व तुमच्या अंथरूणात जाते. मात्र झोपण्यापूर्वी आंघोळ केल्यास हे टाळता येते.
केस राहतील निरोगी (For healthy Hair)
जर तुम्ही सायंकाळी केस धुतले तर तुमच्याकडे त्यांना स्वाभाविक प्रकारे हवेने सुकवण्यासाठी जास्त वेळ असतो.
यामुळे केस मोठ्या कालावधीपर्यंत चमकदार आणि बाऊन्सी बनवते.
सकाळी केसांना ब्लो ड्राय केल्याने केसांचे नुकसान होते, ज्यामुळे ते कमजोर आणि सुस्त होतात.
–
घामापासून होतो बचाव (Prevents sweating)
रात्री आंघोळ केल्याने घाम आणि घामापासून येणारी दूर करता येते.
मांसपेशींमध्ये वेदनांपासून बचाव (Prevention of muscle pain)
दिवसभर काम केल्यानंतर तुमच्या मासपेशींमध्ये वेदना जाणवत असतील तर गरम पाण्याने आंघोळ करण्याने वेदना दूर करण्यात मदत मिळते.
गरम पाणी शरीरावर पडताच, ते मांसपेशींचा तणाव दूर करते आणि चांगल्या झोपेला प्रोत्साहन देण्यास मदत करते.
गरम पाण्याने आंघोळ केल्याने रात्री पायात होणार्या वेदना रोखता येऊ शकतात,
ही एक सामान्य स्थिती आहे जी 60 टक्के लोकांना प्रभावित करते.
Web Title :- Health Tips | health benefits of shower at night experts says night showers can benefit your health and your look
Korean Glass Skin | कोरियन मुलींप्रमाणे त्वचा मिळवायची आहे का? तर ‘हे’ नक्की करा !
Bleach | ब्लीच नंतर चेहऱ्यावर जळजळ, खाज सुटण्यापासून आराम मिळवा; काही घरगुती गोष्टी वापरुन पाहा