आरोग्यानामा ऑनलाईन टीम : अनेक लोकांना पूर्णपणे विवस्त्र होऊन झोपणे थोडे विचित्र वाटत असले तरी त्याचे अनेक फायदे आहे. विवस्त्र झोपण्याचे जसे आरोग्यदायी फायदे आहेत तसेच मानसिक फायदेही आहेत. याचे कोणते फायदे आहेत, ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ थकवा दूर होतो
यामुळे चुटकीसरशी व्यक्तीचा थकवा दूर होतो. आरामदायक झोप लागते.
२ त्वचेचा पोत
त्वचेच्या कार्यामध्ये कपड्यांचा अडथळा येत नाही. त्वचा स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकते. सुरकुत्या येणेही कमी होते.
३ शुक्राणूंची निर्मिती
रात्रीच्या वेळी टाईट बॉक्सर किंवा अंडरवेअर घातल्याने शुक्राणूंच्या क्षमतेवर परिणाम होतो. विवस्त्र झोपल्याने शुक्राणूंची निर्मिती चांगली होते.
४ योनीमार्गाचे आरोग्य सुधारते
स्त्री शरीरातील नाजूक भागात फंगल्सची वाढ होत नाही. परिणामी खाज येणे, इंफेक्शनचा धोका कमी असतो.
५ मन शांत होते
शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते. शांत आणि पटकन झोप येते.
६ सकारात्मकतेने पहाल
स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करून स्वतःला स्विकारणे अधिक सुकर होते. हळूहळू शरीरातील बदल जाणवल्याने दृष्टीकोन बदलायला मदत होईल.
Visit : arogyanama.com