आरोग्यानामा ऑनलाईन टीम : शिमला मिरचीला आपल्याकडे ढोबळी मिरचीसुद्धा म्हणतात. छोट्या हिरव्या मिरचीसारखी ही तिखट नसते. मात्र, यात भरपूर औषधी गुणधर्म असल्याने विविध आजारांवर ती गुणकारी आहे. शिमला मिरचीची भाजी विविध प्रकारे तयार केली जाते. रस्साभाजी, पिठ पेरून केलेली भाजी, पनीर शिमला मिरचीची भाजी, अशा अनेक प्रकारे सिमला मिरचीची तयार करता येते. विशेष म्हणजे संत्र्याच्या तुलनेत शिमला मिरची अधिक लाभदायक आहे. अनेक गंभीर आजारावर शिमला मिरची गुणकारी आहे. या मिरचीचे वैशिष्टये आणि उपयोग आपण जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ संत्र्याच्या तुलनेत शिमला मिरचीमध्ये पाच पट जास्त क जीवनसत्व असते. मात्र, शिमला मिरचीत क जीवनसत्व विशिष्ट पद्धतीने साठवले जात असल्याने त्यातील आंबटपणा जाणवत नाही.
२ ज्यांना आंबट ज्यांना चालत नाही त्यांच्यासाठी शिमला मिरची हा क जीवनसत्वाचा उत्तम स्रोत आहे.
३ संत्र्यात अ जीवनसत्व वाढविणारी कॅरोटीन्स ही द्रव्य असतात. त्यामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते. शिमला मिरचीत ही कॅरोटीन्स संत्र्यापेक्षा दोनपट जास्त असतात.
४ शिमला मिरचीत कॅप्सिनॉईड्स नावाचा पदार्थ असतो. हा शरीरासाठी लाभदायक आहे.
५ शिमला मिरची मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यावर उत्तम उपाय आहे.
६ यामुळे काही प्रमाणात कॅन्सरपासून बचाव होतो.
Visit : arogyanama.com