आरोग्यानामा ऑनलाईन टीम : किवी फळाची लागवड न्यूझीलंड, फ्रान्स, इटली, जपान आणि अमेरिका येथे मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. तपकिरी रंगाचे असलेले हे फळ आतून हिरव्या रंगाचे असते. चव थोडी गोड, आंबट असते. ते आरोग्यासाठी गुणकारी आहे. किवीचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ यात रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असलेल्यांसाठी हे फळ उपयुक्त आहे.
२ ब्लड शुगर कमी होते. थकवा दूर होतो. डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त असते.
३ पचनक्रिया सुधारते.
४ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
५ विटॅमिन सी मुबलक प्रमाणात मिळते.
६ डिप्रेशन दूर करण्यास मदत होते.
७ हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
Visit : arogyanama.com