आरोग्यानामा ऑनलाईन टीम – काही फळांच्या बियांमध्ये औषधी गुणधर्म असतात. परंतु, आपल्याला याविषयी माहित नसल्याने आपण ही फळे खावून बिया टाकून देतो. उपयुक्त असलेल्या फळांच्या बिया जपून ठेवल्यास त्याचा औषधांप्रमाणे उपयोग करता येऊ शकतो. यामुळे आरोग्य चांगले राहू शकते. फळांच्या बियांमधील पौष्टिक तत्त्व जाणुन घेतले पाहिजे. काही फळांच्या बियांच्या फायद्यांविषयी आपण माहिती घेणार आहोत.
द्राक्ष
काळ्या द्राक्षांच्या बिया कधीही फेकून देऊ नका. यामध्ये भरपूर व्हिटॅमिन-ई असते. याच्या तेलाचा वापर औषधांमध्ये केला जातो. या बियामध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतात. जे शरीराच्या टिश्यूजला रॅडिकल्सपासून सुरक्षित ठेवतात. यामुळे डायबिटीजचा धोका कमी होतो.
डाळिंब
डाळिंबाच्या बियामधील अँटीऑक्सीडेंट्स हे कँसर आणि हृदयाचा आजार रोखण्यास उपयुक्त असतात. यामुळे रक्ताच्या गाठी जमा होत नाहीत. शरीर योग्य आकारामध्ये राहते. वजन कमी करण्यासाठी या बियां गुणकारी आहेत. या बिया ग्रीन सलाडसोबत खाऊ शकता.
फणस
फणसाच्या बिया उकडून अथवा भाजी करून खाता येतात भूक कमी लागत असल्यास या बिया खाव्यात. फणसाच्या बिया रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने भूक वाढते.
टरबूज
टरबूजच्या बिया वजन कमी करण्यासाठी उपुयक्त आहेत. या बिया सोलून दूध किंवा पाण्यासोबत सेवन करता येतात.
भोपळा
भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन-बी आणि फॉलिक अॅसिड असते. मूड चांगला करणारे एक केमिकल यामध्ये असते. भोपळ्याच्या बिया डायबिटीजसारख्या रोगांमध्ये फायदेशीर आहेत. यामुळे शरीरातील इंसुलिनचे प्रमाण नियंत्रणात राहते.