आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आवळा हे औषधी फळ आहे. यात व्हिटॅमिन सी, फायबर भरपूर प्रमाणात असते. याचे लोणचे, मुरांबा, ज्यूस, चुर्ण तयार केले जाते. याच्या सेवनाने व्याधी आणि आजार दूर राहतात. आवळा गरम केल्यानंतर किंवा सुकवल्यानंतरही त्यातील व्हिटॅमिनचे प्रमाण कमी होत नाही. आवळ्याचे कोणते फायदे होतात जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ पित्त, कफ आणि जुलाब यांसारख्या आजारांवर रामबाण औषध आहे.
२ पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयोग होतो.
३ स्नायू आणि दात निरोगी राहतात.
४ रक्त वाढविण्यासाठी उपयोगी आहे.
५ डोळ्यांचे आरोग्य राखते.
६ केस काळे आणि मुलायम होतात.
७ मधुमेह नियंत्रणात राहतो.
८ सर्दी, खोकला दूर होतो.
९ चेहरा तजेलदार होतो.
१० हृदयाशी निगडीत आजारांवरही गुणकारी आहे.
११ रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
Visit : arogyanama.com