आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डोळे हे अतिशय महत्वाचे इंद्रिय असून याचे आरोग्य राखणे खुप आवश्यक ठरते. कारण दृष्टी कमजोर असेल तर आपण काहीही करू शकत नाही. यासाठी डोळ्यांचे आरोग्य राखण्यसाठी आणि रोग टाळण्यासाठी चांगला आहार घेणे गरजेचे आहे.
हे पदार्थ आवर्जून खा
१) संत्र्यात विटामिन सी असते. याचे नियमित सेवन केल्यास मोतीबिंदू होत नाही.
२) ब्लू-बेरी आणि ब्लाकबेरीजमधील अन्थोसयानीनमुळे मोतीबिंदू आणि दृष्टी कमी होण्याने येणारा आंधळेपणा रोखला जातो.
३) नियासिन आणि विटामिन ई मुळे वयाबरोबर दृष्टी कमी होण्याचा धोका कमी होतो. यासाठी दिवसातून एकदा तृणधान्यांचे सेवन करावे.
४) विटामिन ई आणि झिंक सूर्यफुलाच्या बियांमध्ये असते. याचे सेवन केल्याने डोळे निरोगी राहतात.
५) बदामात विटामिन ई असते. याच्या सेवनाने मोतीबिंदू तसेच वयोमानामुळे दृष्टी कमी होणे टळते.
६) रोज किमान एक गाजर किंवा एक रताळे खावे. थोड्या ओलिव्ह तेलात परतावं. त्यामुळे त्या भाज्या लवकर विरघळतात आणि शरीराला पोषक ठरतात.
७) पालक आणि ब्रोकोली सारख्या भाज्या नियमित खाल्ल्याने मोतीबिंदू होत नाही. दृष्टी चांगली होते.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)