आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मानसिक ताण, अपूर्ण झोप, आदी कारणांमुळे मायग्रेनची समस्या होते. यामुळे डोकेदुखी असह्य होते. अर्धे डोके दुखते. या आजारावर उपचार नसले तरी काही खास पदार्थांचे सेवन केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो. योग्य आहार, जीवनशैलीत काही बदल कमी धावपळ, कामाच्या तणावापासून दूर राहणे, अशी काळजी घेणे गरजेचे असते.
रिबोफ्लेविनयुक्त हे पदार्थ खा
१. कलेजी
२. दूध
३. दही
४. मशरुम
५. पालक
६. बदाम
७. टोमॅटो
८. अंडी
हे लक्षात ठेवा
* रिबोफ्लेविन किंवा व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाल्ले तर मायग्रेनचा त्रास कमी होतो.
* रिबोफ्लेविन किंवा व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांमुळे शरीराला एनर्जी मिळते.
* शरीरातील सेल्स निकामी होण्यापासून बचाव होतो.
* महिलांनी आहारात रोज साधारण १.१ मिली ग्रॅम तर पुरुषांनी रोज १.२ मिली ग्रॅम रिबोफ्लेविनचा समावेश करावा.