आरोग्यनामा ऑनलाईन- स्तनाचा कँसर महिला आणि पुरुष दोघांना होऊ शकतो. विशेषकरून महिलांना याचा धोका जास्त असतो, कारण महिलांंमध्ये अस्ट्रोजन हार्मोन जास्त उत्सर्जित होते. अनेक शोधांमध्ये खुलासा झाला आहे की, स्तनाचा कँसर हार्मोनमध्ये गडबड आणि खराब जीवनशैलीमुळे होतो. नियमित एक्सरसाइज(Exercising ) केल्याने अनेक प्रकारच्या कँसरचा धोका कमी होतो. स्पेनच्या एका संशोधनात यास दुजोरा मिळाला आहे. या संशोधनात म्हटले आहे की सकाळी एक्सरसाइज(Exercising ) करणार्या लोकांना कँसरचा धोका कमी असतो. या शोधात 2,795 लोक सहभागी झाले होते. हे संशोधन इंटरनॅशनल जनरल ऑफ कँसरमध्ये प्रकाशित झाले आहे.
संशोधनात काय म्हटले आहे
1 सकाळी 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत एक्सरसाइज केल्याने स्तन आणि प्रोस्टेट कँसरचा धोका कमी होतो.
2 अस्ट्रोजन हार्मोन सकाळी 7 वाजता उच्च स्तरावर असतो. अस्ट्रोजन हार्मोन स्तन कँसर पेशांना सक्रिय करतो.
3 शरीरीरात अॅस्ट्रोजन हार्मोन जास्त प्रमाणात उत्सर्जित झाल्यास स्तनाच्या कँसरचा धोका वाढतो.
4 एक्सरसाइज केल्याने अस्ट्रोजन हार्मोनचा वाढता स्तर कमी केला जाऊ शकतो.
ही आहेत कारणे
* पुरूषांपेक्षा महिलांमध्ये अस्ट्रोजन हार्मोन जास्त उत्सर्जित होत असल्याने महिलांना
स्तनाच्या कँसरचा धोका जास्त असतो.
* स्तन कँसर हार्मोनमधील गडबड आणि खराब जीवनशैलीमुळे होतो.
* 5 ते 10 टक्के स्तन कँसर कुटुंबातील पिढ्यांपासून मिळालेल्या जीन म्यूटेशनशी संबंध असतो. याचा धोका टाळण्यासाठी सकाळी 8 वाजता एक्सरसाइज केली पाहिजे.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.