आरोग्यानामा ऑनलाईन टीम : ऑफिसच्या डेस्कवरच अनेकजण दुपारचे जेवण घेतात. वेळ वाचविण्यासाठी केलेली ही कृती आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. यामुळे समस्या होऊ शकतात. ऑफिसच्या डेस्कवरच जेवल्याने शरीराला कोणत्या आजारांना सामोरे जावे लागते, याची माहिती घेवूयात.
१ बॅक्टेरिअल इन्फेक्शन
डेस्कवर आणि कम्प्यूटरच्या किबोर्डवर अनेक जम्र्स आणि बॅक्टेरिया असतात. यामुळे हातांमार्फत हे सगळे बॅक्टेरिया पोटात जातात.
२ घाईमुळे नुकसान
सर्व लक्ष हे कामात असल्याने गडबडीमध्ये जेवण केले जाते. त्यामुळे पचनक्रियेची समस्या निर्माण होते.
३ सांधेदुखी
जागेवरून न उठल्याने सांधे आणि स्नायूंना सूज येण्याची शक्यता असते.
४ मानसिक ब्रेक
रिलिज करण्यासाठी शरीराला कामातून थोडे बाहेर पडणे गरजेचे असते.
५ कामाचा ताण
इतर कामाकडे लक्ष राहिल्याने भविष्यात हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल तसेच डायबेटीस यांसारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.
Visit : arogyanama.com