आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खुप घट्ट जीन्स, वजनदार हँड बॅग्ज, जास्त वजनाचे दागिने व उंच टाचेच्या चपला याचा शरीरावर वाईट परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांना आढळून आले आहे. विशेषत: महिलांकडून अशा प्रकारची फॅशन जास्त केली जात असल्याने त्यांच्यात आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. ब्रिटिश कॅरोप्रॅक्टिक असोसिएशनने केलेल्या सर्वेक्षणात फॅशनचे होणारे विपरित परिणाम दिसून आले आहेत. या सर्वेक्षणात सहभागी एक तृतीयांश स्त्रियांना या गोष्टींबद्दल फारशी माहिती नसल्याचे आढळून आले. ही माहिती मिळाल्यावर, त्यांनी अशा फॅशनबाबत पुनर्विचार करू असे म्हटले.
हे आहेत परिणाम
१) खूप घट्ट जीन्स घातल्याने काम करण्याची क्षमता कमी होते. उठणे-बसणे आणि चालण्यावरही परिणाम होतो.
२) उंच टाचेच्या चपला सतत वापरल्याने सांध्यांवर परिणाम करतात. उडी मारणे, पायी चालण्याच्या क्षमतेवर याचा विपरित परिणाम होतो. चाल मंदावते. जोरात उडी मारता येत नाही.
३) स्त्रिया मोठमोठ्या हँडबॅग वापरत असल्याने त्यांच्यात पाठदुखीचे दुखणे जास्त दिसून येते.
४) वजनदार सॅक, लॅपटॉप बॅगच्या वापरामुळे पुरूषांच्या खांद्यांवर जास्त दाब पडतो. त्यामुळे खांदेदुखी आणि पाठदुखी सुरू होते.
५) वजनदार दागिन्यांमुळे सुद्धा महिलांना पाठदुखी सुरू होते. यामुळे मान, गळ्यावर ताण येतो. मानेचे दुखणे सुरू होऊ शकते.