आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जगभरात चुकीच्या जीवनशैलीमुळे विवाहित तरुण आणि प्रौढांमधील कामेच्छा कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यावर उपचार घेणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. याबाबत भारतातील दिल्लीत सुद्धा नकतेच एक संशोधन करण्यात आले. यात २१ ते ४५ या वयोगटातील स्त्री, पुरुषांच्या जीवनशैलीसह अनेक गोष्टींचा मागोवा घेण्यात आला. या संशोधनात ज्या व्यक्तींचा अभ्यास करण्यत आला, त्यापैकी सुमारे ४८ टक्के लोकांची जीवनशैली चुकीची असल्याचे आढळून आले.
नपुंसकतेची कारणे
1. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी.
2. जंक फूडचे मोठ्या प्रमाणात सेवन.
3. व्यायामाचा अभाव.
4. झोपण्याच्या वेळा अत्यंत अनियमित.
5. धुम्रपान, दारुसारख्या व्यसनांचा अतिरेक.
6. वाढलेला ताणतणाव
* जीवनशैली सुधारा
या कारणांमुळे लैंगिक समस्या उद्भवल्याने अनेकांमध्ये नैराश्य आले असल्याचेही दिसून आले आहे. जीवनशैली लवकरात लवकर सुधारल्यास यातून चांगला मार्ग निघू शकतो.