आरोग्यनामा ऑनलाईन- दूधाच्या पचन आणि पौष्टिक गुणांसाठी आयुर्वेदात विशेष स्थान आहे. तुम्हाला दूध पिणे(drink milk) आवडत असेल तर आयुर्वेदानुसार दूध पिण्याची(drink milk) योग्य वेळ आणि पद्धत जाणून घेतली पाहिजे. आयुर्वेदानुसार आंबा, केळे आणि अन्य आंबट फळांसोबत कधीही दूध घेऊ नका. केळ दूधात मिसळले तर अग्नि (गॅस्ट्रिक फायर) कमी करतात. तसेच दिवसात एक विशिष्ट वेळ असावी, ज्यावेळी दुधाचा सर्वात जास्त लाभ मिळू शकतो.
1 शरीर आणि मांसपेशींची निर्मिती हवी असेल तर सकाळी दूध प्यावे. अन्यथा रात्रीचे वेळा चांगली आहे.
2 अन्य फायद्यासाठी तुम्ही हे अश्वगंधासोबत घेऊ शकता. यामुळे झोपेत सुधारणे होते आणि स्मरणशक्ती वाढते.
3 आयुर्वेदात सर्वांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो, मात्र ज्यांना अॅलर्जी आहे त्यांनी पिऊ नये.
4 दूध सेवन करण्याची सर्वात चांगली वेळ सायंकाळदरम्यान झोपण्यापूर्वी पर्यंत आहे.
5 सकाळी दूधाचे सेवन शक्यतो टाळले पाहिजे. प्राचीन मतानुसार सकाळी दूधाचे सेवन पचनात अडचणी निर्माण करते. सोबत सुस्ती येऊ शकते.
6 पाच वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांनी सकाळी दूध कधीही पिऊ नये. कारण यामुळे अॅसिडिटी होऊ शकते.
7 तसेच खारट खाद्य पदार्थांसोबत दूधाचे सेवन करू नये. जसे की चहा सोबत फरसाण किंवा ब्रेड बटर सोबत दूध.
8 आयुर्वेद लोकांना सायंकाळी दूध पिण्याचा सल्ला देते. रात्री दूध प्यायल्याने तेज वाढते. शरीर शांत होते. चांगली झोप मिळू शकते. दूधातून रात्री कॅल्शियम चांगले मिळते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.