आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हिवाळा, उन्हाळा, पावसाठी अशा सर्वच ऋतुत डासांचा उपद्रव सुरूच असतो. डासांमुळे अनेक आजारही पसरतात. यामध्ये प्रामुख्याने मलेरिया, डेंग्यू असे गंभीर आजारांचा समावेश आहे. डास घरात येऊ नयेत, यासाठी वेळीच खबरदारी घेतली तर हे आजार टाळता येतात. परंतु, केमिकल्सयुक्त कॉइल, लिक्विड इत्यादीचा वापर केल्यास साईड इफेक्ट होण्याची भिती असते. डासांना पळवून लावण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती आपण करून घेणार आहोत.
हे उपाय करा
१ संत्र्याची साल उघडल्यावर ठेवा. स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा.
२ माशा व दुगंर्धीला दूर ठेवण्यासाठी बंद डस्टबिन वापरा.
३ डासांना पळवून लावण्यासाठी तुळस, कडूनिंब घराशेजारी लावा.
४ डासांच्या उत्पत्तीचे ठिकाणे, वस्तू यांना घराशेजारी ठेवू नका.
५ गडद रंगाचे कापड, परफ्यूम व हेअर स्प्रेकडे डास आकर्षित होतात.
६ नारळाचा काथ्या जाळा.
७ घरात रोज कापूर जाळा. यामुळे डास पळून जातील.
८ गडद रंगाच्या उघड्या भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात कापराच्या वड्या टाका. यामुळे घरातील डास बाहेर जातील.