आरोग्यनामा ऑनलाइन टीम – माणसाला अनेक आजाराने ग्रासले जाते. दरम्यान असे काही आजार असतात ते माणसाच्या खाण्यावर देखील अवलंबून असतात. त्यातील एक आजार म्हणजे डायबिटीज (Diabetes) म्हणजेच मधुमेह होय. या आजाराची संख्या देशात वाढताना दिसत आहे. मधुमेह (Diabetes) हा आजार भारतात इतक्या वेगाने पसरत आहे की त्याच्या रुग्णांची संख्या 50 दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे. असं जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) म्हणनं आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मधुमेहाचे मुख्य कारण म्हणजे अयोग्य आहार (Improper Diet) आणि खराब जीवनशैली (Bad Lifestyle) आहे. या आजाराच्या रुग्णांनी आहारावर नियंत्रण गरजेचे असते. मधुमेहाच्या रुग्णांनी अन्नात पिष्टमय (स्टार्च) पदार्थांचे सेवन कमी करावे नाहीतर त्यांच्या समस्या वाढू शकतात. दरम्यान, रक्तातील साखरेचे प्रमाण (Blood Sugar Level) नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात अशा पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे साखर नियंत्रणात राहते. मधुमेही रुग्णांनी (Diabetes Patients) खाण्याच्या सवयी सुधारल्या तर हा आजार नियत्रंणात ठेवता येतो. (Diabetes)
मधुमेहाच्या रुग्णांनी भात खावा का (Can Diabetics Eat Rice) ?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी साखरेच्या रुग्णांनी आहारातून भात वगळावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भात खायचा असेल तर काही खास प्रकारचा भात खा. भात खाणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे आणि त्याऐवजी आपण कोणत्या प्रकारचे भात वापरू शकतो तेही माहिती असणे महत्वाचे आहे.
भात साखर कशी वाढवते (How Does Rice Increase Sugar) ?
पांढरा तांदूळ (White Rice) टाइप दोन मधुमेहाचा (Type-2 Diabetes) धोका वाढवू शकतो. तांदळात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स (High Glycemic Index) असतो जो रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवण्यास जबाबदार असतो. असं ब्रिटिश मेडिकल जर्नलनुसार माहिती समोर आली आहे. तर, तांदळातील उच्च ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवते. त्यात सूक्ष्म अन्नद्रव्ये, फायबर आणि पॉलिफेनॉलचे प्रमाण खूप कमी असते जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक ठरू शकते.
दरम्यान, मधुमेहाचे रुग्ण एका दिवसात फक्त 45 ते 60 ग्रॅम कार्बोहायड्रेट घेऊ शकतात. पण, भातामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे ते टाळलेलेच बरे असं सांगितलं आहे. दरम्यान, पॉप्युलेशन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट (Population Health Research Institute), हॅमिल्टन हेल्थ सायन्सेस आणि मॅक मास्टर युनिव्हर्सिटी कॅनडा (Hamilton Health Sciences and Mac Master University Canada) यांनी साखर वाढवणाऱ्या पदार्थांवर 10 वर्षांचे संशोधन केले आहे. त्यामध्ये दक्षिण आशियातील (South Asia) लोक दिवसाला ६३० ग्रॅम तांदूळ खातात, ज्यामुळे मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो. असं दिसून आलं.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पांढरा तांदूळ पांढरा आणि चमकदार बनवण्यासाठी पॉलिशिंग केली जाते,
ज्यामुळे आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे निघून जातात. भात खायचा असेल तर ब्राऊन राइस (Brown Rice) निवडा.
तपकिरी तांदूळ फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक तत्वांनी (Fiber, Vitamins, Minerals And Nutrients)
समृद्ध आहे जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकते.
ब्राऊन राइसची वैशिष्ट्ये (Features Of Brown Rice) –
– ब्राऊन राईस मध्ये स्टार्च कमी असतो.
– त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.
– मधुमेहाचे रुग्ण ब्राऊन राईसचे सेवन करू शकतात.
– तुम्ही रोल केलेले आणि स्टील-कट ओट्स, बार्ली, बल्गर, बाजरी आणि बकव्हीटचे पीठ वापरू शकता.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Diabetes | diabetes does eating rice raise blood sugar
To Remove Bad Smell | शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या
Hair Fall पासून होईल सुटका, केस होतील काळे आणि दाट, ‘या’ तेलाने करा मालिश