आरोग्यनामा ऑनलाईन- कढीपत्ता(curry leaves) आपल्या घरात अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरतात. पण आपल्याला माहित आहे का की कढीपत्ता(curry leaves) आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे.
आपल्याला कढीपत्ता कडुलिंब म्हणून देखील माहित आहे. कढीपत्त्यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आढळतात, जे शरीराचे अनेक रोग दूर करतात. जर तुम्ही खाण्यासाठी रोज कढीपत्ता वापरला तर तुमच्या रक्ताचे प्रमाण नियंत्रित राहील.
_केस गळतीच्या समस्येवर गुणकारी
आपण कढीपत्त्याचे नियमित सेवन केल्यास आपल्या केसांची मुळे मजबूत होतात तसेच केस काळे होऊन केस गळणे थांबते.
_ आपण दररोज कढीपत्त्याचे सेवन केले तर आपले वजन कमी करण्यास तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते
_आपण दररोज कढीपत्त्याचे सेवन केले तर नजर टिकून राहते म्हणून दररोज कढीपत्त्याचे सेवन करावे.
_ कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.