आरोग्यनामा ऑनलाईन- दालचिनी(cinnamon) एक गरम मसाला आहे. हे भारत आणि श्रीलंकामध्ये सर्वाधिक आढळते. हा मसाला जगभर चवींचा स्वाद वाढविण्यासाठी वापरला जातो. इंग्रजीमध्ये त्याला सिन्नमन म्हणतात. आयुर्वेदात हे औषध म्हणून वापरले जाते. विशेषतः कोरोना कालावधीत त्याचे महत्त्व वाढले आहे, कारण हे औषध सर्दी-खोकला आणि तापावर उपयुक्त आहे. दालचिनीचा(cinnamon) काढा पिल्याने लवकरच आराम मिळतो.
यात अॅण्टी-ऑक्सिडंट, अॅण्टी-इंफ्लेमेटरी, अॅण्टी डायबेटिक, सिनामेल्डेहाइड, सिनॅमिक अॅसिड, अॅण्टी-मायक्रोबियल आणि फायटोकेमिकल्स असल्याचे आढळले आहे जे कर्करोग आणि मधुमेहासह अनेक रोगांमध्ये फायदेशीर आहेत. त्याचबरोबर दालचिनीमध्ये असे काही असते जे लोकांसाठी हानिकारक असू शकतात. त्यासाठी दालचिनीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. दालचिनीचे सेवन करण्यापूर्वी कोणत्या लोकांना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे ते आपण आज जाणून घेऊया…
दालचिनीमध्ये कुमेरिन असते जे मसाल्याला गोड चव देते. तथापि, वैद्यकीय शास्त्रामध्ये याचा उपयोग रक्त पातळ करणारे औषध करण्यासाठी केला जातो. जर तुम्ही रक्त पातळ करणारे औषध घेत असाल तर दालचिनीचे सेवन करु नये.
तोंडात फोड येण्याची समस्या
तोंडात फोड येण्याची ही एक सामान्य समस्या आहे. हे अॅलर्जीमुळे होते. जर आपल्याला वारंवार तोंडात फोड येत असतील तर दालचिनीचे सेवन करणे टाळा. सेवन केल्यास आवश्यक खबरदारी घ्या. यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याच्या अति वापरामुळे तोंडात फोड येऊ शकतात.
लीव्हरची समस्या
दालचिनीमध्ये कोमेरिन असते जे लीव्हरला हानी पोहचवू शकते. कावीळ आणि लीव्हर सिरोसिस ग्रस्त रूग्णांनी दालचिनीचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
गर्भवती महिलांनी सेवन करू नये
गर्भवती महिलांनी दालचिनीचे सेवन करु नये. तसेच, स्तनपान करणाऱ्या महिलांना दालचिनीचे सेवन करुन नये. जर आपण दालचिनी खाण्याचा विचार करत असाल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मधुमेहाची समस्या
तज्ञाच्या मते, जर मधुमेहाने ग्रस्त असलेली एखादी व्यक्ती औषधे घेत असेल तर त्याने दालचिनी घेऊ नये. त्यात आढळणारे कंपाऊंड रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते. यामुळे चक्कर येणे आणि अशक्त होण्याचा धोका वाढतो.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.