आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Blood Sugar | मधुमेह (Diabetes) ही एक गंभीर आरोग्य स्थिती आहे जी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करते. काही फळांमध्ये साखरेचे प्रमाण (Blood Sugar) जास्त असल्यामुळे मधुमेहींसाठी काही फळे (Fruits) हानिकारक ठरू शकतात असा लोकांचा सहसा समज असतो. मात्र काही गोष्टी लक्षात ठेवून फळांचा आस्वाद घेता येतो.
द्राक्षांमध्ये (Grapes) भरपूर आवश्यक जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे (Minerals) असतात. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी, Vitamin K, B6 जीवनसत्त्वे तसेच थायामिन (Thiamine), रिबोफ्लेविन (Riboflavin), पोटॅशियम (Potassium), कॉपर (Copper) आणि मँगनीज (Manganese) यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात. आरोग्य तज्ञांच्या मते, व्हिटॅमिन के (Vitamin K) रक्त घट्ट करते आणि ते वाहण्यापासून रोखते, तर व्हिटॅमिन सी (Vitamin C) हा अँटीऑक्सिडंट (Antioxidant) स्त्रोत आहे.
मात्र, सामान्यतः असे मानले जाते की मधुमेहींनी द्राक्षे खाऊ नये कारण त्यात उच्च ग्लायकोमेटिक इंडेक्स (High Glycemic Index) असतो. पण काळ्या द्राक्षात (Black Grapes) भरपूर फायबर असते आणि ते साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.
अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की काळी द्राक्षे शरीरात इन्सुलिनचे (Insulin) उत्पादन सुधारतात,
ज्यामुळे शरीर आपली वाढलेली साखर पचवण्यास सुरुवात करते. ज्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल (Blood Sugar Control) राहते.
मात्र, द्राक्षे खाताना विशेष काळजी घ्यावी लागते. एका दिवसात जास्त काळी द्राक्षे खाऊ नका कारण काळ्या द्राक्षातील साखरेचे प्रमाण ब्लड शुगर (Blood Sugar) वाढवू शकते.
ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये (British Medical Journal) प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, आख्खी फळे,
सफरचंद (Apple), ब्लूबेरी (Blueberry) आणि द्राक्षे यांचे सेवन केल्यास टाइप 2 मधुमेहाचा (Type 2 Diabetes) धोका कमी होतो.
याशिवाय, रेझवेराट्रोल (Resveratrol) हे एक रासायनिक संयुग आहे जे जेवणानंतर शरीराद्वारे साखरेचे नियमन करण्यासाठी ओळखले जाते.
द्राक्षांमध्ये रेसवेराट्रोल असते आणि त्यामुळे मधुमेहींना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत होते.
काळ्या द्राक्षांमध्ये आढळणारे ल्युटीन (Lutein) आणि झेक्सॅन्थिन (Zeaxanthin) नावाचे कॅरोटीनॉइड घटक (Carotenoid)
मधुमेहामुळे डोळ्यांच्या समस्यांनी (Eye Problems) ग्रस्त असलेल्या लोकांना फायदा देतात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काळ्या द्राक्षांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स डोळ्यांची दृष्टी (Eye Vision) सुधारण्यास मदत करतात आणि डोळे आतून निरोगी ठेवतात.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Blood Sugar | blood sugar can eating grapes increase blood sugar in diabetes know what myths and facts diabetes
Diabetes Control Diet | ब्लडमध्ये शुगरची लेव्हल कंट्रोल ठेवते काकडी, जाणून घ्या कसा करू शकता वापर