आरोग्यानामा ऑनलाईन टीम : प्रत्येक घरात बटाट्याचा वापर विविध पदार्थ बनविण्यासाठी केला जातो. बटाट्याची भाजी तर आपण नेहमीच खातो. बटाट्यात विविध औषधी गुणधर्म असल्याने त्याचे इतरही अनेक उपयोग आहेत. आरोग्याच्या दृष्टीने बटाट्याच्या रसाचे अनेक फायदे असून ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ डोळ्यांखाली सूज व काळी वर्तुळे असल्यास ताज्या बटाट्याच्या रसात कापसाचा बोळा ओला करून डोळ्यांभोवती लावा.
२ एक-दोन चमचे बटाट्याचा रस पाण्यात मिसळा व नाश्ता आणि दोन वेळेच्या जेवणाआधी घ्या. असे एक-दोन आठवडे नियमित केल्यास अपचन किंवा अॅसिडिटी दूर होते.
३ बटाटाच्या रस स्काल्फ आणि केसांना लावा. वीस मिनिटे किंवा तासाभराने केस थंड पाण्याने धुवा. यामुळे कोंड्याची समस्या ही दूर होईल. तसेच केस स्वच्छ, मजबूत आणि काळेभोर होतील.
४ कच्चा बटाट्याच्या रसात दाहशामक गुणधर्म असल्याने कोपर, मान, पाठ, खांदे आणि गुडघ्याच्या दुखण्यावर हा नैसर्गिक उपाय आहे. यामुळे सांधेदुखीवर आराम मिळतो.
५ बटाट्याच्या रस घेतल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. किडनी, पित्ताशय व यकृताचे कार्य सुधारते. अतिरिक्त कोलेस्टड्ढॉल बाहेर टाकले गेल्याने पेशींचा रक्तप्रवाह सुधारतो.
६ बटाट्याचा रस त्वचेला लावल्याने पिगमेंटेशन कमी होते. त्वचेतील घाण निघून जाते.
Visit : arogyanama.com