आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चेहऱ्यावरील मुरूम हाताने फोडल्याने डाग पडतात. यामुळे चेहरा खराब दिसू लागतो. सौदर्यात बाधा येते. हा अनुभव अनेक तरूण-तरूणींना नेहमीच येत असतो. हे टाळण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय कसे करायचे याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
हे उपाय करा
१ मुरमाच्या जागेवर स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. हातात असलेले बॅक्टिरिया तेथे जाऊन संक्रमण पसरवू शकतात.
२ मुरूम आल्यानंतर अशाठिकाणी खाज सुटते, मात्र तिथे खाजवू नका. अशाने सूज तर वाढेल शिवाय डाग पडण्याची शक्यताही वाढते.
३ मुरूमामुळे लालसरपणा आणि सूज येते. या जागेवर बर्फ लावा. यामुळे लालसरपणा आणि सूज कमी होते. बर्फ २० मिनिटाहून अधिक वेळे ठेऊ नका.
आता बेंजोयल पेरोक्साइड लावा. मुरूम फोडल्यावर त्यातील पस आतील बाजूला शिरू शकते. बेंजोयल पेरोक्साइड त्या जागेवरील बॅक्टिरिया कमी करते. सूजही कमी होईल. डाग पडण्याची शक्यता कमी होते.