https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_62d74f27676ae78ad057d603239c7216.js
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

Alzheimer’s Disease Causes And Symptoms | सावधान ! अल्झायमर होण्याची ‘ही’ आहेत कारणं, अशा गोष्टींचं सेवन केल्यास आजार गंभीर होऊ शकतो

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
April 3, 2022
in ताज्या घडामाेडी, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Alzheimer's Disease Causes And Symptoms | alzheimer s disease causes and symptoms tips to prevent alzheimer-s problem

Photo Pixabay

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Alzheimer’s Disease Causes And Symptoms | आरोग्य उत्तम राखण्यासाठी शारीरिक आणि मानसिक व्यायाम घेणे अत्यंत गरजेचे आहे. शारीरिक व्यायाम (Physical Exercise) आपण घेऊ शकतो. परंतु मानसिक व्यायाम (Mental Exercise) आपल्याकडून केला जात नाही. त्याचा परिणाम म्हणून काहींना अल्झायमरसारखा आजार (Alzheimer’s Disease) होतो. पूर्वी हा आजार वृद्ध व्यक्तींमध्ये व्हायचा पण आता सहजपणे चाळिशी उलटलेल्या व्यक्तींमध्येही आढळत आहे. अल्झायमर हा डिमेंशिया आजाराचा एक प्रकार मानला जातो. या विकारांत संज्ञानात्मक क्षमता कमकुवत होतात, परिणामी स्मरणशक्ती कमजोर होणे आणि निर्णय घेण्यात अडचण येऊ लागते (Alzheimer’s Disease Causes And Symptoms).

 

अल्झायमर या आजारात मेंदूच्या पेशी कमकुवत होऊ लागतात (Weakening Of Brain Cells). तुमच्या कुटुंबातील कुणाला असा त्रास झाला असेल तर तुम्हीही त्याची काळजी घ्यायला हवी. अल्झायमर हा अनुवांशिक विकार म्हणून ओळखला जातो. या व्यक्तींनी आहाराची विशेष काळजी (Special Diet for Alzheimer’s Disease) घ्यावी. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

 

ज्या कुटुंबातील व्यक्तींना पूर्वी म्हणजे साधारण एक ते दोन पिढ्या अगोदर हा आजार झाला असेल तर तो पुढील पिढीत होण्याची भिती असते. अल्झायमर रोगामध्ये गोंधळ, स्मरणशक्तीची समस्या, विचार करण्यात अडचण, दैनंदिन सोपी कामे करण्यात अडचण, चिंताग्रस्तपणा आणि अगदी परिचित व्यक्ती आणि गोष्टी ओळखण्यात अडचण यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या रोगाचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करत राहणे महत्वाचे आहे (Alzheimer’s Disease Causes And Symptoms).

 

बेकरी पदार्थ आणि मासांहार टाळा (Avoid Bakery Products And Meat) –
मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहाराची विशेष भूमिका असते. आपल्याला या आजारांचा अनुवांशिक धोका असेल तर याबद्दल विशेष खबरदारी घेणे अधिक आवश्यक ठरते. संशोधनात असे दिसून आले आहे की प्रक्रिया केलेले आणि संरक्षक पदार्थांचे सेवन केल्याने आपला धोका आणि रोगाची तीव्रता वाढू शकते. अल्झायमरचा धोका टाळण्यासाठी जाम, जेली आणि चीज, ब्रेड आणि प्रक्रिया केलेल्या मांसासह गोठलेले संरक्षक पदार्थ टाळले पाहिजेत.

आहार कसा असावा (How The Diet Should Be) –
अल्झायमरपासून बचाव करण्यासाठी आहार कसा ठेवावा?, याबाबत प्रोसिडिंग्ज ऑफ द न्यूट्रिशन सोसायटीच्या संशोधन पत्राद्वारे काही सूचना करण्यात आल्या आहेत. व्हिटॅमिन -बी आणि फोलेटयुक्त गोष्टींचे सेवन (Vitamin-B And Folate Rich Food) केल्याने वृद्धत्वासह उद्भवणार्‍या मानसिक आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते. फोलेट-युक्त आहार संपूर्ण मज्जासंस्था मजबूत आणि निरोगी ठेवून मेंदूची कार्ये सुलभ करण्यास मदत करतात.

 

हिरव्या भाज्यांचे सेवन फायदेशीर (Benefits Of Green Vegetables) –
जे लोक दिवसातून कमीत कमी एक हिरवी भाजी सेवन करतात त्यांना संज्ञानात्मक घट आणि स्मृती कमी होण्याचा धोका (Risk Of Cognitive Decline And Memory Loss) कमी असतो. पालेभाज्यांमधून फोलेट, जीवनसत्त्वे -ए आणि सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स (Folate, Vitamins A And C, Fiber And Antioxidants) भरपूर प्रमाणात मिळतात. हिरवी पालेभाजी खाल्याने दीर्घकाळापर्यंत मेंदूच्या आरोग्यास चालना मिळते. यामधील फोलेटचे प्रमाण निरोगी लाल रक्तपेशी तयार करण्यास आणि मेंदूची कार्ये अधिक चांगल्या प्रकारे राखण्यासाठी उपयुक्त आहे.

 

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काय करावे (What To Do To Improve Mental Health) ?-
सर्व लोकांनी मानसिक आरोग्याबद्दल सतर्क राहणे आवश्यक आहे. शारीरिक हालचाली, नियमित व्यायाम-योग करा.
लोकांना भेटा, बोला, तुमच्या अडचणी शेअर करा. आहार आणि हायड्रेशनची (Diet And Hydration) विशेष काळजी घ्या.
तुम्हाला आवडणार्‍या गोष्टी करा. तणाव-चिंता व्यवस्थापित करण्यासाठी उपाय करा.

 

कोणत्याही प्रकारची मानसिक आरोग्याची समस्या जाणवल्यास नि:संकोचपणे तज्ज्ञांचा सल्ला घ्या,
असे न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Alzheimer’s Disease Causes And Symptoms | alzheimer s disease causes and symptoms tips to prevent alzheimer-s problem

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

हे देखील वाचा

 

Hypertension Causes And Prevention | यामुळे वाढतोय हायपरटेन्शनचा त्रास, जाणून घ्या औषधांशिवाय कसं नियंत्रण ठेवाल?

Cholesterol Control | ‘हे’ 3 सुपरफूड्स तुमचे कोलेस्ट्रॉल करतील कंट्रोल, हृदय सुद्धा राहील सुरक्षित

Hot Water And Jaggery | सकाळी उठताच करा ‘या’ गोष्टींचे सेवन, अनेक गंभीर आजारांपासून होईल सुटका, शरीर राहील निरोगी

Tags: Alzheimer's Disease Causes And SymptomsAlzheimer’s DiseaseAlzheimer’s Disease CausesAntioxidantsAvoid Bakery Products And MeatBenefits Of Green VegetablesdietexercisefiberFolateFolate rich foodhealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestyleHow The Diet Should BeHydrationlatest healthlatest marathi newslatest news on healthLifestyleMemory LossMental ExercisePhysical ExerciseRisk Of Cognitive DeclineSpecial Diet for Alzheimer’s DiseaseSymptomstodays health newsVitamin-BVitamins A. CWeakening Of Brain CellsWhat To Do To Improve Mental Healthअँटीऑक्सिडंट्सअल्झायमरसारखा आजारआजारआरोग्यआहारआहार कसा असावाजीवनसत्त्वे -ए. सीफायबरफोलेटबेकरी पदार्थ आणि मासांहार टाळामानसिक आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर आहेमानसिक व्यायामव्यायामव्हिटॅमिन-बीशारीरिक व्यायामहायड्रेशनहिरव्या भाज्यांचे सेवन फायदेशीरहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
Health Tips | Health will change completely in 2023, include these 4 foods in your diet plan
ताज्या घडामाेडी

Health Tips | 2023 मध्ये पूर्णपणे बदलून जाईल आरोग्य, डाएट प्लानमध्ये या 4 फूडचा करा समावेश

by Nagesh Suryawanshi
January 23, 2023
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Health Tips | भारतीय लोक असा आहार खातात, ज्यामध्ये योग्य प्रमाणात पौष्टिक फळे आणि भाज्यांचा अभाव...

Read more
Normal BP | How much BP should be according to age and female-male calculation, see chart

Normal BP | वय आणि महिला-पुरुषांच्या हिशेबाने किती असावा बीपी, पहा चार्ट

January 23, 2023
Bad Cholesterol | These 5 Ayurvedic Remedies Will Help Lower Bad Cholesterol (LDL), Increase Good Cholesterol

Bad Cholesterol | खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यासाठी मदत करतील हे ५ आयुर्वेदिक उपाय, वाढेल गुड कोलेस्ट्रॉल

January 23, 2023
Weight Loss | Drink milky pumpkin soup to reduce obesity, along with many health benefits!

Weight Loss | लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्या दुधी भोपळ्याचे सूप, सोबतच आरोग्याला होतील अनेक फायदे!

January 23, 2023
Diarrhea in Children | Don't ignore the problem of diarrhea in children, know 5 symptoms and treatment

Diarrhea in Children | मुलांच्या डायरियाच्या समस्येकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या 5 लक्षणे आणि उपचार

January 23, 2023
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021

https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_12a509b063a96161625ad1369bb83aaa.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_c854cc360049fa79f34f56ddfb34a6ce.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_ed3b4417df0895e4cf8465d32b69adc6.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_168b9e73ae0afd819b60016837864cec.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_71ed5d351d462619d0b359f73f22bc2c.js