आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आनंदी जीवनासाठी आरोग्याशी निगडीत काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. स्वत:ला तंदुरूस्त ठेवले तर असे सूखी जीवन जगता येऊ शकते. म्हणूनच मन आणि शरीराच्या आरोग्यासाठी प्रत्येकाने काही वेळ काढला पाहिजे. बदललेल्या जीवनशैलीमुळे कामाच्या पाठीमागे अनेकजण लागलेले असतात.
यामुळे त्यांचा आहाराकडे दुर्लक्ष होते. शिवाय, चूकीचा आहार मोठ्याप्रमाणात घेतला जातो. चांगल्या आरोग्यासाठी अशी जीवनशैली बदलून आदर्श जीवनशैलीचा पाठपुरावा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच मन आणि शरीर आनंदी ठेवण्यासाठी दिवसातील काही वेळ हासले पाहिजे.अनेकजण तरूणपणी आरोग्याची योग्य काळजी घेत नाहीत.
त्यामुळे त्याना उतारवयात संपूर्ण आयुष्य डॉक्टर आणि औषधांच्या आधारेच जगावे लागते. मन आणि शरीर निरोगी आणि आनंदी ठेवण्याचा खूपच सोपा, मोफत उपाय उपलब्ध आहे. केवळ त्याचा लाभ घेता आला पाहिजे. हा मार्ग म्हणजे हसणे होय. सर्व रोगांवर एकच रामबाण औषध आहे ते म्हणजे हसणे. सकाळच्या वेळी अवघ्या विस मिनिटापर्यंत तुम्ही हसलात तर दिवसभर ताजेतवाने होऊ शकता. हसण्यामुळे आरोग्य सुधारते. शिवाय, आत्मविश्वासही वाढतो. यामुळे अनेक गंभीर आजारही दूर होतात. शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढून मन प्रसन्न राहते. कामातही लक्ष लागते. यासाठी थोडा वेळ काढून हसायला हवे.