आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अननस हे मधूर फळ सर्वांनाच आवडते. या फळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन तसचे प्रोटीन्स असल्याने आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. अननसात अनेक औषधी गुणधर्म असल्याने औषध म्हणून अननसाचा वापर करण्यात येतो. यातील ब्रोमोलिन मुळे कॅन्सरपासून बचाव होतो. संशोधन आढळून आले आहे की, अननसात कॅन्सरविरोधी तत्व भरपूर प्रमाणात आहेत.
पचनक्रिया सुधारते
अननसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. अननसामध्ये ब्रोमोलिन नावाचे तत्व असल्यामुळे खराब अॅसिड शरीराबाहेर पडते आणि यामुळे पचनक्रिया व्यवस्थित चालते. तसेच लठ्ठपणा वाढत नाही.
चेहरा उजळतो
कोमल, नाजूक त्वचेसाठी अननस लाभदायक आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी असते, त्याचबरोबर यामधील व्हिटॅमिन ए मुळे चेहऱ्याची जळजळ कमी होते. उन्हामुळे चेहरा काळवंडला असेल तर अननस हे फळ उपयुक्त आहे. चेहऱ्यावर याचा रस लावल्यास चेहरा उजळतो. चेहऱ्यावरील डाग नष्ट करण्यासाठी अननसाचा रस उपयुक्त आहे.
हाडांसाठी उपयुक्त
यातील मॅग्नेशियममुळे हाडे मजबूत होतात. या व्यतिरिक्त यामध्ये असलेले ब्रोमेलिन तत्व हाडांच्या आजारापासून आपले रक्षण करते. सांधेदुखीत अननसाचे सेवन अवश्य करावे.
डायबिटीज
यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि गोडवाही कमी असल्याने साखरेचा स्तर वाढत नाही. डायबिटीजच्या रुग्णांनी आहारात अननसाचा वापर करावा.
हृदयरोग
हृदयाशी संबंधित आजारात अननस खावे. अननस शरीरातील एलडीएल कमी करते. एलडीएलमुळे हृदयाचे आजार होण्याचा धोका वाढतो.