आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अंडे (Egg) हे कंप्लीट फूड आहे, असे म्हटले जाते. परंतु, अंडे (Egg) पुर्णपणे शिजल्यानंतरच त्यातील पौष्टीक तत्व शरीराला मिळतात. कच्चे अंडे खाल्ल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. कच्चे अंडे खाल्ल्याने कोणते धोके आहेत, ते कसे खावे, कोणती काळजी घ्यावी, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
1. अंडे योकसोबत खावे.
2. उकडलेले अंडे सलादमध्ये मिक्स करुन खाऊ शकता.
3. अंड्याचे ऑमलेट बनवून खावे.
4. दूधासोबत उकडलेले अंडे खाऊ शकता.
5. वजन वाढवण्यासाठी अंडा करी किंवा अंड्याची भूर्जी बनवून खाणे फायदेशीर असते.
हे आहेत धोके
1. कच्च्या अंड्यामध्ये सोल्मोनेला बॅक्टेरिया असतात. यामुळे इम्युनिटी कमी होते. यामुळे इन्फेक्शन लवकर होऊ शकते.
2. यामुळे शरीराला प्रोटीन्स पूर्णपणे मिळू शकत नाहीत. मसल्स कमजोर होऊ शकतात.
3. यामुळे शरीरात बायोटिनेचे पूणपणे अॅब्जॉर्शन होत नाही. शरीरात ग्लुकोज तयार होण्याच्या प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो.
4. प्रेग्नेंसीमध्ये कच्चे अंडे खाल्ले तर युटरसमध्ये क्रॅम्प होते. यामुळे नवजात बाळाचा जन्म वेळेपूर्वी होऊ शकतो.
5. कच्च्या अंड्यातील बॅक्टेरियामुळे इनडायजेशनची समस्या होते. फूड पॉयजनिंग होऊ शकते.
ही काळजी घ्या
1. अंडी जास्त काळ साठवून ठेवू नका.
2. अंड्यावर क्रॅक असेल, रंग बदललेला असेल तर अशी अंडी खरेदी करू नका.
3. अंडे वापरण्यापूर्वी मीठाच्या पाण्याने धुवून घ्या.