आरोग्यानामा ऑनलाईन टीम : महिलांची स्वयंपाक घरात नेहमीच घाईगडबड सुरू असते. अशावेळी त्या अनेक वस्तू फ्रिजमध्ये ठेवतात. बाजारातून आणलेले जवळपास सर्वच पदार्थ फ्रिजमध्ये ठेवले जातात. परंतु, काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्या पदार्थांमधील पोषकतत्वे कमी होतात. कोणते पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणे हानिकारक आहे ते जाणून घेवूयात.
हे आहेत ते पदार्थ
१ टोमॅटो
फ्रिजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचे आवरण निघते. त्यामुळे टोमॅटो खराब होतात. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतात.
२ केळी
केळी कधीही फ्रिजमध्ये ठेवू नयेत. ती काळी पडू लागतात. यातून इथायलीन गॅसही निघतो. यामुळे पोट बिघडण्याची शक्यता असते.
३ मध
मध फ्रिजमध्ये ठेवू नये. अधिक घट्ट होते. पोषक तत्वेही कमी होतात.
४ ब्रेड
ब्रेड फ्रिजमध्ये कधीही ठेवू नये. यामुळे टेस्ट तर बदलते. किटाणू सुद्धा होऊ लागतात. आरोग्यावरही परिणाम होतो.
५ कॉफी
कॉफी खूप लवकर दुसऱ्या पदार्थाचा स्वाद ओढून घेते. त्यामुळे कॉफीची टेस्टही बिघडते. आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
Visit : arogyanama.com