आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अधिक काम आणि ताणतणावामुळे आपल्याला रात्री चांगली झोप लागत नाही. त्यामुळे आपला दिवसही चांगला जात नाही. आणि आपल्याला अनेकजण सांगतात की, सकाळी योगा केल्याने आपला दिवस चांगला जातो. ताणतणाव कमी होतो. आणि आपल्याला झोपही चांगली लागते. परंतु ,आपल्याला सकाळी योगा करायला वेळ नसतो. त्यामुळे आपण योगा करू शकत नाही. पण आपल्याला जर चांगली झोप यावी अस वाटत असेल तर आपण रात्री झोपताना योगा केल्यास आपल्याला रात्री चांगली झोप लागते.
शांत झोप लागण्यासाठी रात्री करा ही योगासने :
१) हस्तापादासन :
पाठीचे स्नायू ताणले जातात, रक्त पुरवठा वाढल्याने मज्जासंस्था पुष्ट होते. आणि पाठीचा कणा लवचिक राहतो.
२) शिशु आसन:
पूर्ण विश्रांती देणारं हे आसन आहे. मज्जासंस्था स्थिर झाल्याने झोपही शांत लागते.
३) बद्धकोनासन :
तासंतास उभं राहिल्याने किंवा चालल्याने आलेला थकवा घालवण्यासाठी उत्तम. मांड्यांचा आतील भाग, जांघा आणि गुडघे चांगलेच
ताणले जातात.
४) मर्जरी आसन :
पाठीच्या कण्याची लवचिकता टिकून राहते. पचन संस्थेलाही चालना मिळते. व त्याची कार्यक्षमता वाढते. यामुळे शांत झोप लागते. रक्ताभिसरण वाढल्याने मन ही शांत होते.