चांगली झोप येत नाही ? करा हे उपाय
पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण वेळेवर जेवण करत नाहीत. तसेच वेळेवर झोपतही नाहीत. आणि कामाच्या धावपळीमुळे ताणतणाव खूप वाढल्यामुळे अनेक जण मानसिक रुग्ण झाले आहेत. त्यामुळे त्यांना रात्रीची झोप व्यवस्थित लागत नाही. झोप व्यवस्थित झाली नाही. तर आपण कोणतेही काम व्यवस्थित करू शकत नाही. वरिष्ठांचे बोलणी खावी लागतात. आणि त्यातून अजून ताणतणाव निर्माण झाल्याने आपल्याला झोप लागत नाही. तुम्हाला जर तुमच्या मानसिक आजरातून बाहेर पडून चांगली झोप यावी अस वाटात असेल तर खालील गोष्टी करा.
१) चांगली झोप येण्यासाठी झोपण्याआधी एक ग्लास गरम दूध प्या. कॅल्शिअमचा स्रोत असलेले दुधात सेरोटोनिन चांगली झोप यायला मदत करतात. दुधासोबत बदाम किंवा केळं खाणेही फायदेशीर ठरू शकते. हर्बल टी पिल्यानेही चंगली झोप लागू शकते.
२) काहींना जेवणानंतर लगेच झोपण्याची सवय असते. पण जेवल्यानंतर लगेच झोपू नका. जेवणात सूप, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. आणि आहार हलका ठेवा. जेवल्यावर लगेच आंघोळ करू नका. झोपण्याच्या आधी ध्यानधारणा केली तर चांगली झोप लागू शकते.
३) झोपण्याच्या १०-१५ मिनिटं आधी हाताला आणि पायाच्या तळव्यांना हळुवार मसाज करा. मसाज करण्यासाठी तिळाचे, बदामाचे किंवा खोबरेल तेल वापरा. यामुळे दिवसभराचा थकवा दूर होतो. आणि चांगली झोप लागते.
४) अनेकांना सवय असते कि, ते रात्री अंथरुणात पडल्यावर दिवसभराचे मेसेज आणि सोशल नेटवर्क चेक करतात. पण तसे कधीच करू नका. तसे करण्याची आता आपल्याला सवय लागली आहे. पण खर तर या गोष्टी टाळायला हव्या. झोपण्याच्या २० मिनीटे आधी टीव्ही, कॉम्पुटर, मोबाईल अजिबात पाहू नका. आणि झोपताना लाईट बंद करून झोपा जेणेकरून तुमच्या डोळ्यावर प्रकाश येणार नाही. आणि तुम्हाला चांगली झोप लागेल.