आरोग्यानामा ऑनलाईन टीम : अभिनेत्यांसारखे सिक्स पॅक अॅब्स बनविण्यासाठी अनेक तरूण मेहनत घेत असतात. तरूणांमध्ये अशाप्रकारची क्रेझ असते. त्यासाठी ते जीम, हेवी डाएट आणि प्रोटीन्स घेत असतात. परंतु, कधीकधी मेहनत करूनही यश मिळत नाही. याची कारणे वेगवेगळी असतात. योग्य मार्गदर्शनाचा अभाव हे त्यापैकी एक महत्वाचे कारण होय. यासाठी काही खास टिप्स आपण जाणून घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
1 आहार
फायबर असलेले पदार्थ शरीराचे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. परंतु, यामुळे अॅब्स बनवण्यास मदत मिळत नाही.
2 सप्लीमेंट्स
सप्लिमेंट्स पेक्षा हार्ड ट्रेनिंग, योग्य आहार आणि आरामाची गरज असते.
3 क्रंच अॅन्ड सिट-अप्स
या दोन्ही एक्सरसाइझ अॅब्स बनवण्यासाठी फायदेशीर नाहीत. याऐवजी स्टॅडिंग क्रंच, साइड बेंड्स आणि नी रायझेस एक्सरसाइज कराव्यात.
4 अॅब्ज वर्कआउट
दररोज अॅब्ज वर्कआउट करू नका. कारण मसल्सना रिकव्हर आणि रिबिल्ड होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे रोज एकसारख्या एक्सरसाइझ न करता, वेगवेगळ्या करा.
5 एकाच प्रकारची एक्सरसाइझ
एकाच प्रकारच्या एक्सरसाइझ केल्यामुळे मसल्स बनत नाहीत. मेडिसिनल बॉल किंवा डम्बेल्सचाही वापर करावा.
Visit : arogyanama.com