आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेक लोक असे आहेत जे आपल्या हाईटला घेऊन खूपच नाराज असतात. तुम्हाला माहिती असेल की, हाईटची समस्या ही जेनेटीक आहे. आईवडिलांवरही हाईट अवलंबून असते. परंतु तम्ही थोडी मेहनत घेतली तर सहज हाईट वाढवू शकता. आपण हाईट वाढवण्याच्या काही एक्सरसाईजबाबत माहिती घेणार आहोत. या व्यायामांमुळे तुमची हाईटही वाढेल आणि तुम्ही फिटही रहाल. जरी तुमचे वय 25 पेक्षा जास्त असेल तरीही या एक्सरसाईज तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
1) पुल अप्स- एखाद्या बारला तुम्हाला लटकायचे आहे. एखाद्या गार्डनमध्ये किंवा जिममध्ये तुम्ही असे बार पाहिले असतील. या बार लटकून तुम्हाला स्वत:ला हाताच्या मदतीने वर उचलायचे आहे आणि पुन्हा खाली यायचे आहे. यामुळे नसांमध्ये तणाव निर्माण होतो.
2) अधोमुख श्वान आसन- एकदम सरळ उभे रहा. दोन्ही हात सरळ करत जमिनीच्या दिशेने आणा. कमरेत वाकत असताना गुडघे सरळच ठेवा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत असावे. हात जमिनीवर टेकवा. हाताची बोटेही समांतर ठेवा. या आसनासाठी स्वत:ला धनुष्याच्या आकारात वाकवा. श्वास सोडा आणि घ्या. आता टाचा थोड्या उचला. हिप्सला पेल्विसपासून थोडं ओढा. हल्कासा प्युबिसकडे दाब द्या.
3) भुजंगासन- आधी तुम्ही पोटावर झोपा. पाय आणि शरीराचा अर्धा भाग जमिनीवर ठेवा. दोन्ही हात जमिनीवर टेकवत छातीला वर उचला. कमरेच्या वरचा भाग नागाच्या फन्यासारखा वर उचला. ही पोजीशन तुम्हाला 10 वेळा करायची आहे. उंचीसाठी हा एक महत्त्वाचा व्यायाम आहे.
4) स्विमिंग– स्विमिंग हा शरीरासाठी सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. स्विमिंगमुळे तुमची हाईट तर वाढतेच परंतु तुम्ही फिटही राहता.
5) स्किपिंग- स्किपिंग म्हणजे दोरीउड्या हा खूप सोपा व्यायाम आहे. तुमची हाईट वाढवायला याने खूप मदत होते. एक दोरी घेऊन तुम्हाला एका दमात जमेल तेवढ्या दोरीउड्या मारायच्या आहेत.