आरोग्यानामा ऑनलाईन टीम : कामाच्या ठिकाणी अनेकांना दररोज शजू आणि सॉक्स घालावे लागतात. परंतु, सतत सॉक्स घातल्याने पायांना हवा, ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी काही काळ सॉक्स काढून पायांना हवा लागू दिली पाहिजे. दिवसभर सॉक्स घातल्याने कोणते दुष्पपरिणाम होतात, ते जाणून घेवूयात.
हे आहेत दुष्परिणाम
फंगल इन्फेक्शन
पायातून येणारा घाम सॉक्समध्ये मुरतो. या ओलाव्यामुळे त्यात बॅक्टेरिया होतात. यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते.
रक्त संचार
घट्ट सॉक्स घातल्याने पायांच्या नसा दबल्या जातात. यामुळे व्यवस्थित रक्त संचार होत नाही. यामुळे पूर्ण शरीरातील रक्त संचार प्रभावित होतो. यामुळे पायांचा त्रास वाढतो. पाय दुखतात.
एडीमा
एखाद्या भागात तरल पदार्थ जमा होणे, त्या जागेवर सूज येणे हे एडीमाचे लक्षण आहे. ही सूज हळूहळू वाढते. यामुळे पाय सुन्न होतात. ही बाब फार गंभीर आहे..
अशी घ्या काळजी
सिंथेटीकचे सॉक्स वापरण्यापेक्षा सूती कापडाचे वापरावे. काही काळ शूज आणि सॉक्स पायातून काढून ठेवा.
Visit : arogyanama.com