• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

Vitamin Rich Foods | केस,नखे आणि त्वचेसाठी अप्रतिम आहेत ‘या’ 8 गोष्टी; आहारात करा समाविष्ट, जाणून घ्या

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
May 14, 2022
in ताज्या घडामाेडी, फिटनेस गुरु, माझं आराेग्य, लाईफ स्टाईल
0
Vitamin Rich Foods | 8 best vitamin rich foods for good hair skin and nails

file photo

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Vitamin Rich Foods | निरोगी शरीरासाठी संतुलित आहाराची गरज असते. आहाराने शरीराच्या आतील गरजा तर पूर्ण होताच शिवाय बाहेरील अवयवांनाही त्याचा फायदा होतो. केस नखे आणि त्वचेची काळजी घेताना सौंदर्यप्रसाधनांचा वापर करू नये. विविध जीवनसत्वे असलेल्या गोष्टी आहारात ध्याव्यात. चला तर मग जाणून घेऊया याचे फायदे (Vitamin Rich Foods).

 

ब्राऊन राईस (Brown Rice) :
ब्राऊन राईसमध्ये बायोटिन आणि पाण्यात विरघळणारे व्हिटामिन बी केसांसाठी आणि नखांच्या वाढीसाठी उत्तम असते. त्याच बरोबर बार्ली, बल्गेरियन गहू आणि क्विनोआचे सेवन करू शकतात. याच्यामुळे नखे आणि केस खराब होत नाही आणि बळकट होतात (Vitamin Rich Foods).

 

अंडे (Eggs) :
अंड्यांना प्रथिनांचा राजा म्हटले जाते. शिवाय अंड्यामध्ये जस्त आणि सिलेनियम मोठ्या प्रमाणात असते. ते आपल्या टाळूसाठी खुप चांगले असते. म्हणून आहार तज्ज्ञ दररोज अंडे खाण्याचा सल्ला देतात.

 

गाजर (Carrot) :
व्हिटामिन ए तयार करणारे बीटा कॅरोटिनचा साठा गाजरात भरपूर प्रमाणात असतो. व्हिटामिन ए हे निरोगी टाळूसाठी खुप उपयोगी असते. तसेच भोपळा, गोड बटाटे आणि पिवळी सिमला मिरचीतही व्हिटामिन ए भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्याचेही सेवन करावे.

बदाम (Almond) :
बदामात बायोटिनचे प्रमाण खुप असते. त्यामुळे आपली नखे बळकट होतात. तसेच त्यात आढळणारे व्हिटामिन ई हे केस आणि टाळू चांगला ठेवण्यासाठी वापरता येते.

 

फॅटी फिश (Fatty Fish) :
व्हिटामिन डी हे या फॅटी फिशमध्ये मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेला आणि केसांना खुप फायदा होतो.सॅल्मन, मॅकरेल आणि टूना या फिशचे सेवन करावे. हे सर्व मासे ओमेगा फॅटी अ‍ॅसिडने भरलेले असतात.

 

मशरुम (Mushroom) :
मशरुममध्ये व्हिटामिन डी भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे केस बळकट होतात आणि केसांना चमकही येते. स्टे सेल्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले की, टाळूमध्ये नवीन केस उगवण्याच्या प्रक्रियेतही व्हिटामिन डी गुणकारी ठरलेले आहेत.

 

किवी (Kiwi) :
कोलेजन आणि त्वचा निर्मितीच्या प्रक्रियेत उपयुक्त ठरणारे व्हिटामिन सी हे किवी या फळात भरपूर प्रमाणात आढळते.
त्यातील अँटी ऑक्सीडेन्ट गुणधर्म त्वचा गुळगुळीत ठेवण्यासाठी महत्वाचे ठरतात.
किवीव्यतिरिक्त लिंबूवर्गीय फळांमध्ये सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते, त्याचेही सेवन केल्यास फायदा मिळेल.

ब्रोकोली (Broccoli) :
ब्रोकोलीमध्ये आढळणारे लोह हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असे खनिज आहे.
निरोगी त्वचा आणि नखे मजबूत ठेवण्यासाठी लोहचा खुप उपयोग होतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Vitamin Rich Foods | 8 best vitamin rich foods for good hair skin and nails

 

हे देखील वाचा

 

Foods For Summer Season | उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा, होणार नाही त्रास; जाणून घ्या

 

Cholesterol Reduce Tips | कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करावे? हार्ट अटॅकचा धोकाही कमी होईल; जाणून घ्या

 

Summer Health Tips | जाणून घ्या उन्हाळ्यात नाकातून रक्तस्त्राव होण्याची कारणे, परिणाम आणि प्रतिबंध उपाय

Tags: AlmondBroccolibrown ricecarrotEggsFatty fishGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In Marathihairhealthhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathihealth tipshealthy lifestylekiwilatest healthlatest marathi newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on healthlatest news on Vitamin Rich Foods Newslatest Vitamin Rich FoodsLifestylemarathi in Vitamin Rich Foods NewsmushroomNailsSkintodays health newstoday’s Vitamin Rich Foods Newsvitamin AVitamin Dvitamin eVitamin Rich FoodsVitamin Rich Foods marathi newsVitamin Rich Foods NewsVitamin Rich Foods News today marathiVitamin Rich Foods todayVitamin Rich Foods today Newsअंडेकिवीकेसगाजरगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यात्वचानखेफॅटी फिशबदामब्राऊन राईसब्रोकोलीमशरुमव्हिटामिन ईव्हिटामिन एव्हिटामिन डीहेल्थ टिप्सहेल्थी लाइफस्टाइल
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021