आरोग्यानामा ऑनलाईन टीम : पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा तडाखा आणि अचानक वाढणारी आद्रता अशा वातावरणात व्हायरल इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. घसरलेली हवेची गुणवत्ता, वाढलेले प्रदूषण यामुळे वातावरणात विषाणूंचा संसर्ग वाढतो. यामुळे विविध प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होतात.
हे आहेत परिणाम
१ ताप येतो.
२ सर्दी, अंगदुखी, खोकला येतो.
३ श्वसनविकारांचा त्रास होतो.
४ घशात दुखणे, गिळताना त्रास होतो.
५ घशात खवखव, घशात आतून बारीक पुरळ येणे.
६ टॉन्सिलच्या गाठी सुजणे.
७ सर्दीमुळे नाक चोंदणे.
काळजी घ्या
* अतितेलकट, थंड, आंबट खावू नये.
* आहार चांगला व वेळेत घ्यावा.
* शिंक किंवा खोकताना रुमाल वापरा.
हे आहेत उपाय
१ डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक, वेदनाशामक घ्या.
२ नाक, छाती भरून आली तर वाफारा घ्या.
३ कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा.
Visit : arogyanama.com