आरोग्यानामा ऑनलाईन टीम : लठ्ठपणा ही समस्या सध्या मोठ्याप्रमाणात वाढत चालली आहे. या समस्येच्या पाठीमागे विविध कारणे असतात. त्यापैकी अयोग्य आहार, चुकीच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली हे घटक प्रामुख्याने जबाबदार असतात. लठ्ठपणाला बळी पडलेल्या व्यक्तीला अनेक व्याधी अगदी सहज जडतात. लठ्ठपणाचे हे दुष्परिणाम अतिशय गंभीर असू शकतात. परंतु, या दुष्परिणामांचेही दोन प्रकार असून हे दोन प्रकार कोणते ते आपण जाणून घेणार आहोत.
लठ्ठपणाच्या दुष्परिणामाचे दोन प्रकार
१ चयापचयाशी संबंधित परिणाम
* डायबेटीस, कोलेस्टेरॉल, उच्च- रक्तदाब इत्यादी.
* चयापचयाशी संबंधित आजार हे थोडेही वजन वाढले तरी आपले डोके वर काढतात.
२ स्थूलतेशी संबंधित परिणाम
* हाडे व स्नायूंचे आजार- पाठदुखीपासून गुडघे दुखीपर्यंत.
* हाडांच्या व स्नायूंचे आजार वजनातील लक्षणीय वाढीनंतरच होतात.
Visit : arogyanama.com