आरोग्यानामा ऑनलाईन टीम : काही लोकांना झोपेत चालण्याची सवय असते. ही समस्या का होते, याची माहिती अनेकांना नसते. ही समस्या कोणत्याही वयोगटात दिसून येते. जी व्यक्ती रात्री झोपेत चालते तिला सकाळी उठल्यानंतर काहीही आठवत नाही. यामागे कोणती कारणे असतात, ते जाणून घेवूयात.
ही आहेत कारणे
१ मेंदुत दोन प्रकारची रसायने तयार होतात. यापैकी एक झोपताना आणि दुसरे जागे होतो तेव्हा तयार होते. हे केमिकल नियंत्रित राहिल्यास आपल्याला झोप येते. याचे संतुलन बिघडल्यास काही लोक झोपेत चालू लागतात. म्हणजेच झोपल्यानंतरही शरीर सक्रिय राहते.
२ काही जण गाढ झोपेत आणि नॉन रॅपिड आय मूव्हमेंटच्या अवस्थे चालतात. त्यामुळे जाग आल्यावर काहीही आठवत नाही. हा स्मरणशक्तीचा भाग नसतो.
३ ही सवय लहान मुलांमध्ये जास्त आढळते. त्यांच्या शरीरात जीएबीए हे केमिकल असते. या केमिकलमुळेच झोप येते. पण काही मुलांच्या शरीरात हे केमिकल कमी प्रमाणात असल्याने ते झोपेत चालतात. मोठ्यांमध्ये तणाव, थकवा आणि जास्त कॅफिनचे सेवन ही कारणे असू शकतात.
४ कमी झोप घेणे, मानसिक तणाव, अल्कोहोल, डिप्रेशन आणि एखाद्या गोष्टीती जास्त चिंता हेही कारण असू शकतात.
Visit : arogyanama.com