आरोग्यानामा ऑनलाईन टीम : आठवड्यातील सुटीच्या रविवारी अनेकजण मौजमजा करतात, आराम करतात, आणि सोमवारी पुन्हा कामावर हजर होतात. अनेकांना वाटते की आनंददायी सुटीनंतर सोमवारी कामावर जावे लागत असल्याने सोमवार हा सर्वात डिप्रेसिंग दिवस आहे. परंतु, तसे नाही. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने केलेल्या अभ्यानुसार मंगळवार हा सर्वात जास्त निराशा आणि बोरिंग आहे. त्याची कारणे कोणती ते जाणून घेवूयात.
ही आहेत कारणे
1 काही लोकांचा विकेंड सोमवारी पूर्णपणे संपलेला नसतो आणि त्यामुळे मंगळवार येई पर्यंत लोकांमध्ये डिप्रेशन दिसते.
2 कारण पुढील विकेंड येण्यासाठी आणखी 3 दिवस वेळ लागणार असतो.
3 आठवड्यातील सर्वात आनंदी दिवस शनिवार आहे.
4 शनिवारचे आनंदाचे हे वातावरण रविवारपर्यंत टिकून राहते.
Visit : arogyanama.com