आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जवळपास सर्वच ठिकाणी डासांची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. डास चावल्याने अनेक गंभीर आजार होतात. यासाठी डास निर्मूलन करणे गरजेचे असते. घरात डास येऊ नयेत म्हणून काही घरगुती उपाय करता येतात. यासाठी काही वनस्पती उपयोगी ठरतात. या वनस्पती बाल्कनी अथवा अंगणात लावल्यास डासांचा त्रास कमी होतो.
हे आहेत उपाय
१) पुदीना
पुदीन्याचे रोप घरात लावल्यास डासांपासून सुटका मिळवता येते.
२) लॅव्हेंडर
लॅव्हेंडरचा सुंगध हा डासांना तुमच्या घरात येण्यापासून रोखतो. हे झाड घराच्या बाल्कनीत लावू शकता.
३) लेमनग्रास (गवताचा प्रकार)
जेथे लेमनग्रास असते तेथे डास जास्त काळ राहू शकत नाहीत.
४) सिटड्ढोनेलो
या वनस्पतीपासून तयार केलेल्या अगरबत्ती मिळतात. तसेच ही वनस्पती अंगणात किंना बाल्कनीमध्ये लावू शकता.
५) पेटूनिया
पेटूनिया हे फारच आकर्षक फूल आहे. या फूलाचे रोप घराच्या आवारात किंवा घरात लावल्यास डास कमी होतात.