आरोग्यनामाऑनलाईन- मुलांमधील लठ्ठपणा ही सध्या जगभरातील गंभीर समस्या बनली आहे. अनेक लहान मुलेसुद्धा या समस्येने ग्रस्त आहेत. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबियाच्या शास्त्रज्ञांना मुलांमधील लठ्ठपणाचे मूळ सापडले असून हा धोका वाढविणाऱ्या जनुकाचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.
या अध्ययनाचे प्रमुख मायकल रोसेनबूम यांनी सांगितले की, मुलांना लठ्ठपणाच्या धोक्यापासून वाचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. समजा त्यांचे शरीर व वर्तनामध्ये होणाऱ्या बदलांबाबत आधीच जाणून घेता आले तर त्यांना लठ्ठपणाची शिकार होण्यापासून वाचविलेजाऊ शकते.खास प्रकारचे हे एफटीओ जनुक मुलांच्या खाण्यापिण्याला प्रभावित करते.
सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमोर्फिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जनुकामुळे भविष्यात मुलांचे वजन वाढणे वा ते लठ्ठपणाची शिकार ठरत असल्याचा शोध घेतला जाऊ शकतो. पाच ते दहा वर्षे वयोगटातील १२२ मुलांवर झालेल्या या अध्ययनात असे दिसून आले की, या जनुकामुळे मुले जास्त कॅलरी ग्रहण करू लागतात. अशा स्थितीत भविष्यात त्यांचे वजन मोठ्या प्रमाणात वाढते.