आरोग्यनामा ऑनलाईन- डोळे पाणावण्यामागील(Tears ) मुख्य कारण म्हणजे अश्रु नलिकांमध्ये अडथळा होय. अशा परिस्थितीत थंड किंवा कोमट कपड्याने डोळे किंचित दाबून ठेऊन आराम मिळवू शकता. मन उदास असते तेव्हा डोळ्यांतून अश्रू (Tears )येतात. टीव्ही, फोन, लॅपटॉप वापरताना डोळे पाणवतात तसेच कमजोरीमुळे किंवा दृष्टी कमी झाल्यामुळे देखील असे होऊ शकते.
अकारण डोळ्यांतून पाणी किंवा अश्रू बाहेर आले तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांच्या मते, अश्रूंमुळे डोळ्याचा पृष्ठभाग ओलसर राहतो. परंतु पाणावलेल्या डोळ्याने स्पष्ट दिसत नाही. त्याशिवाय इतर समस्यांना तोंड देतात. म्हणूनच, लवकर उपचार करणे चांगले. घरगुती उपचार देखील केले जाऊ शकतात. या घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या.
थंड पाण्याची पट्टी –
पाणवलेल्या डोळ्यांचे मुख्य कारण अश्रु नलिकांमध्ये असलेला अडथळा आहे. अशा परिस्थितीत थंड किंवा कोमट कपड्याने डोळे किंचित दाबून आराम मिळतो. अश्रू नलिकांमधील अडथळा असल्याचे मानले जाणारे थर काढून टाकते. डोळ्यातून विषारी पदार्थ काढून टाकले जातात आणि जळजळ बरी होते.
टी बॅग एक चांगला उपाय –
आपल्याला चहाची पिशवी गरम पाण्यात थोडा काळ ठेवावी लागेल. यानंतर डोळ्यावर ठेवा आणि कॉम्प्रेस करा. चहाच्या पिशव्या किंवा पाणी जास्त तापणार नाही याची खबरदारी घ्या. हे आपल्याला त्वरीत आराम मिळविण्यात मदत करेल.
मीठ आणि पाण्याचे द्रावण –
जास्त पाण्यामुळे डोळ्यांत खाज सुटणे किंवा जळजळण्याची समस्या होते. यातून आराम मिळवण्यासाठी मीठ आणि पाण्याचे द्रावण एक चांगला उपाय मानला जातो. मीठात अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत, जे डोळ्यांमधून विषारी जीवाणू बाहेर काढण्यास उपयुक्त आहेत. उपाय तीन दिवस सुरू ठेवा. तो दिवसातून 4 ते 5 वेळा करू शकता.
बेकिंग सोडा –
एका भांड्यात पाणी गरम करावे आणि नंतर त्यात एक चमचा बेकिंग सोडा घाला. आता या मिश्रणाने डोळे 2-3 वेळा धुवा.
धूळ गेली असेल तर जर डोळ्यात धूळ आणि घाण गेली तर डोळ्यातून पाणी येत. ओल्या कापडाच्या सहाय्याने ते स्वच्छ करू शकता. डोळ्यांमधून पाणी किंवा अश्रू येत असेल तर कपड्याचा वापर करणे योग्य आहे.
डोळ्यातील पाण्याची समस्या अशा सोडावा
– डोळ्यांना सूर्यप्रकाशापासून वाचवा
– खाज सुटताना डोळ्यांना स्पर्श करु नका
– धूळ आणि घाणीपासून संरक्षणासाठी चष्मा लावा
– एलर्जी असलेल्या पदार्थापासून काळजी घ्या
– स्वतःची मेकअपची उत्पादने दुसऱ्याला देऊ नका
– डोळे जास्त पाणवले तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
डोळ्याच्या आरोग्यासाठी आहार
निरोगी डोळ्यासाठी आहारात पालेभाज्या, ताजी फळे, मासे, कोरडी फळे आणि अक्रोडचा समावेश करा. मासे आणि अक्रोडमध्ये ओमेगा -3 फॅटी असिड असतात. त्याच्या सेवनाने डोळे कोरडे होण्याची समस्या दूर होते. ब्रोकोली, कोबी, पालक, वाटाणे यात अँटीऑक्सिडंट्ससह ल्युटीन असते. त्याद्वारे डोळ्यांचे आजार टाळता येतील.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.