Tea With Namkeen | तुम्ही चहा सोबत नमकीनचा आनंद घेता का? सोडून द्या ही सवय, अन्यथा होईल असे नुकसान
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Tea With Namkeen | भारतात पाण्यानंतर सर्वात जास्त सेवन केले जाणारे पेय म्हणजे चहा आहे. सकाळची सुरुवात असो वा संध्याकाळचा निवांत वेळ, चहाचा घोट घेतल्याशिवाय जात नाही. पण चहा पिताना अनेक वेळा अशा चुका होतात ज्यामुळे आरोग्याला हानी पोहोचते. (Tea With Namkeen) चहासोबत खारट स्नॅक्स खाणे अनेकांना आवडते, परंतु अनेकांना माहीत नसते की, असे केल्याने आपण आपल्या शरीराचे शत्रू बनत आहोत. आहारतज्ज्ञ सांगतात की, चहासोबत नमकीन खाल्ल्याने कोणत्या समस्या होऊ शकतात (Don’t Consume Tea With Namkeen).
चहा आणि नमकीन एकत्र खाण्याचे तोटे
1. अपचन (Indigestion)
चहा तयार करण्यासाठी साखर आणि नमकीन बनवण्यासाठी मीठ वापरले जाते. बहुतेक डॉक्टर खारट आणि गोड पदार्थ एकत्र खाण्याची शिफारस करत नाहीत. असे केल्याने पोटात गॅस तयार होतो आणि अपचनाची समस्या उद्भवते.
2. अॅसिडिटी (Acidity)
काही नमकीन पदार्थांमध्ये ड्राय फ्रुट्स (Dry fruits) वापरलेले असतात. ड्राय फ्रुट्स कधीही चहासोबत खाऊ नयेत. जर तुम्ही चहा आणि ड्रायफ्रुट्ससोबत नमकीन खाल्ल्यास अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. (Tea With Namkeen)
3. पोटात मुरडणे (Abdominal Cramps)
चहा बनवताना दुधाचा वापर केला जातो आणि दुधासोबत खारद पदार्थ अजिबात खाऊ नये कारण ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
खारट पदार्थांमध्ये रिफाईंड कार्ब्ज असतात, जे पचायलाही खूप कठीण असते. चहा आणि नमकीन एकत्र खाल्ल्यास पोटात दुखू शकते.
4. पोटदुखी (Abdominal Pain)
काही नमकीन बेसनाच्या साहाय्याने तयार केले जातात, पण ते चहासोबत खाल्ल्याने पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
तसेच हळद असलेल्या नमकीनमुळे पचनक्रिया बिघडते.
जर तुम्हालाही चहा आणि नमकीन एकत्र खाण्याची आवड असेल तर आजच ही सवय सोडा नाहीतर नुकसान सहन करायला तयार व्हा.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Tea With Namkeen | dont eat namkeen with tea side effects snacks indigestion acidity abdominal cramps pain stomachache colic
Smelly Underarms | घामाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात का? या उपायांद्वारे होईल सुटका
Raw Milk | कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी लाभदायक की नुकसानकारक? जाणून घ्या काय आहे सत्य
Soup and Salad | ‘सूप आणि सलाड’चे अशाप्रकारे करू नका सेवन, फायद्याऐवजी होईल नुकसान