आरोग्यानामा ऑनलाइन टीम : अनेकांना अंगावर टॅटू गोंदवण्याची आवड असते. सध्यातर ही फॅशनच झाली असून ती प्रचंड वाढली आहे. परंतु, ही फॅशन धोकादायक ठरू शकते. यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याची शक्यताही असते. याबाबत करण्यात आलेल्या एका संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी सावधगिरीचा इशाराही दिला आहे.
हे लक्षात ठेवा
१ टॅटू आपण कोणाकडून आणि कुठे गोंदवतो हे खूपच महत्त्वाचे आहे.
२ रस्त्यावर, अस्वच्छ ठिकाणी आणि माहीत नसलेल्या कुठल्याही ठिकाणी टॅटू गोंदवू नका.
३ टॅटू गोंदवणारे एकच निडल परत परत वापरत असतील तर हे अत्यंत घातक आहे.
४ टॅटू गोंदवताना चांगल्या आणि माहितीतल्या पार्लरचीच निवड करा.
५ निडल निर्जंतुकच आहे का याची खात्री करून घ्या. शक्यतो प्रत्येक वेळी नवीन निडल वापरली पाहिजे.
६ ही सावधगिरी बाळगली तर धोका थोडा कमी होऊ शकतो.
७ टॅटू काढताना शरीरात गेलेले विषारी पदार्थ त्वचेत तसेच राहतात. हे विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढण्यासाठी पुन्हा महागडा उपचार घ्यावा लागतो.
८ टॅटूच्या निडलमधील शाई थेट शरीरात जाते. त्वचेखाली ती साचून राहते. त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.
९ टॅटूच्या शाईमध्ये निकेल, क्रोमियम, मॅँगनिज, कोबाल्ट इत्यादी विषारी पदार्थ असतात. हे पदार्थ शरीरात गेल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. कॅन्सरचा धोकासुद्धा वाढतो.
१० टॅटूमुळेजी रंगद्रव्ये शरीरात जातात ती कायम शरीरात राहतात. त्याचे दुष्परिणाम नंतर भोगावे लागू शकतात.
Visit : arogyanama.com