आरोग्यनामा ऑनलाईन- वायु प्रदूषण झाल्याने श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, मळमळ आणि इतर समस्यांना तोंड द्यावे लागते. डोळे सर्वात संवेदनशील आणि महत्वाचा भाग आहेत, अशात वायु प्रदूषणापासून त्यांना वाचवणे(take care ) आवश्यक ठरते. प्रदूषणात डोळ्यांची देखभाल(take care ) कशी करावी ते जाणून घेवूयात.
1 स्क्रीन डिव्हाइसचा कमी वापर
स्क्रीन डिव्हाइस, जसे की मोबाइल फोन आणि लॅपटॉपचा वापर जास्त काळ करू नका.
2 कॉन्टॅक्ट लेन्स टाळा
डोळ्यात खाज किंवा रेडनेस असल्यास कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
3 हेल्दी डाएट घ्या, हायड्रेटेड राहा
मासे, हिरव्या पालेभाज्या, गाजर, पालक, अक्रोड आणि जांभूळ असा आहार घ्या. डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसात आठ ते दहा ग्लास पाणी प्या.
4 डोळ्यांच्या मेकअपचा वापर करू नका
डोळ्यांना त्रास होत असेल तर अशा स्थितीत मेकअप करून नका. यामुळे संसर्ग वाढू शकतो.
5 प्रदूषकांच्या संपर्कात येणे टाळा
डोळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी हानिकारक प्रदूषकांच्या संपर्कात येऊ नका.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.