मेडिटेशन कुठे आणि कसे करता येईल
* बाथरूममध्ये शॉवरखाली केलेल्या मेडिटेशनमुळे चांगला फायदा होतो, असे तज्ज्ञ सांगतात. अंगावर पडणारे पाणी आणि आजुबाजूच्या जेल, शाम्पू आणि साबणामुळे शरीर सुवसित होत असते. अशा वेळी शॉवरखालील मेडिटेशनमुळे मनाला आनंद मिळतो.
* लिफ्ट रिकामी असताना लिफ्टच्या कोपऱ्यात उभे राहून ध्यान लावावे. कोपऱ्यात उभे राहुन मेडिटेशन केल्याने बाहेरून येणाऱ्या लोकांचा त्रास सुद्धा होणार नाही.
* बाथरूममध्ये आपण स्नान करताना एकटेच असल्याने येथे एकाग्र होवून चांगल्याप्रकारे मेडिटेशन करू शकतो. बाथरूममध्ये मेडिटशन करताना पाय जमीनीवर सरळ ठेवावे व डोळे बंद करावे.
* रस्त्यावर सिग्नलला उभे असता याचा फायदा घेता घेईल. सिग्नलला उभे असताना डोळे बंद न करता हे मेडिटेशन करावे.
* सकाळ, संध्याकाळ बागेत फिरण्यासाठी गेल्यानंतर तेथे बाकावर बसून ही क्रिया करता येईल. खुल्या वातावरणातील मेडिटेशन मनाला प्रसन्नता देते. मनावरील ताण दुर होतो.
* गर्दीपासून वाचण्यासाठी आपण सब-वेचा वापर करतो. सब-वे मध्ये कमी गर्दी असल्याने येथे देखील मेडिटेशन करू शकता. मनाला शांत करण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. येथे मेडिटेशन केल्याने वेळ वाचतो.