आरोग्यनामा ऑनलाईन टीम – धावपळीच्या आयुष्यात अनेकांना आपल्या गरजांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. कामाचा ताण आणि थकवा यामुळे बहुतांश लोक रात्री न जेवताच झोपतात. तर काही लोक जाड होण्याच्या भीतीने रात्री जेवत नाहीत. परंतु तुम्हांला माहित आहे का तुमची ही काहीच न खाता रिकाम्या पोटी झोपण्याची सवय आरोग्याला नुकसान पोहोचवणारी ठरू शकते. रिकाम्या पोटी झोपल्यास अनेक आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे उपाशी पोटी झोपल्यास आपल्या आरोग्याला कसे नुकसान पोहचू शकते. हे आपण जाणून घेणार आहोत.
१) रिकाम्या पोटी झोपल्यास दुसर्या दिवशी थकवा जाणवू लागतो आणि तुमचा सगळा दिवस कंटाळवाणा जातो. त्यामुळे उपाशी पोटी झोपू नका.
२) ज्यांना रात्री उपाशी पोटी झोपण्याची सवय असते त्यांच्या चयापचय क्षमतेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शरीराच्या इन्सुलिन पातळीवरही परिणाम होतो. त्यामुळे उपाशी पोटी झोपणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप घातक आहे.
३) तुम्ही जर रिकाम्या पोटी झोपल्यास कोलेस्ट्रॉल, थायरॉईड पातळीदेखील बिघडते.त्यामुळे रात्री कधीच उपाशी पोटी झोपू नका कारण तुमची ही सवय अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते.
४) रिकाम्या पोटी झोपल्यास रात्री भुकेमुळे पोटात वेदना होऊ शकतात. त्यामुळे झोपमोड होते. त्यामुळे अखंडित झोपेसाठी रिकाम्या पोटी झोपू नका.
५) ज्यांचं वजन जास्त आहे. अशा व्यक्तींना वाटते की रात्री रिकाम्या पोटी झोपल्यास वजन लवकर कमी होईल आणि असे जर आपल्यालाही वाटत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण रिकाम्या पोटी झोपण्याने वजन कमी होत नाही मात्र आरोग्याचे नुकसान होते.