आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वाढणारे वय, हार्मोन बदल, प्रदूषण आणि इतर कारणांमुळे त्वचेच्या समस्या सुरु होतात. त्वचेच्या समस्या असल्यास काही आयुर्वेदिक घरगुती उपाय केल्यास चांगला फरक दिसून येतो. कांती उजळण्यासाठी काही खास घरगुती उपाय असून हे उपाय कसे करावेत, याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.
कांती उजळ्ण्यासाठी पाहिला उपाय बेसनपीठाचा आहे. हा उपाय करण्यासाठी घरगुती स्क्रब तयार करावा. हा स्क्रब बनवण्यासाठी एक चमचा बेसन पीठ, एक ते दोन चमचा मसूरच्या डाळीचे पीठ, दोन ते तीन चमचे उडदाच्या डाळीचे पीठ, एक चमचा गुलाब पाणी आणि एक ते दोन चमचे मध मिसळून घट्ट पेस्ट तयार करून चेहèयावर लावावी.
अर्धा चमचा संत्र्यांचा रस घेऊन त्यामध्ये दोन ते पाच थेंब लिंबाचा रस, अर्धा चमचा मुलतानी माती, अर्धा चमचा चंदन पावडर आणि गुलाब पाण्याचे काही थेंब टाकून चांगल्याप्रकारे फेटावे. हे मिश्रण थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवावे. नंतर मिश्रण संपूर्ण चेहऱ्यासह गळ्यावर १५ ते २० मिनिटे लावून हळूवार मसाज करावी. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाकावा. तेलकट त्वचेसाठी हा चांगला उपाय आहे.
एक वाटीत २ चमचे दूधाची साय घेऊन त्यात लींबू रस टाकून फेटावे. हे मिश्रण तुपासारखे संपूर्ण चेहऱ्यावर ५ ते १० मिनिटे लावून मसाज करावा. १० मिनिटानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. या फेसपॅकमध्ये लींबू असल्याने चेहरा स्वच्छ होऊन मुलायम आणि चमकदार होते. रोमछिद्र जास्त मोठे झाले असतील तर त्यावर टोमॅटोचा रस, लिंबाचा रस आणि कच्चे दुध यांचे मिश्रण करून हे मिश्रण त्यावर लावावे.
चेहऱ्यावर डाग, पुरळ, सुरुकुत्या असतील तर दोन बारीक केलेले बदाम, दोन चमचे दुध आणि एक चमचा वाळलेल्या संत्र्यांच्या सालीचे चूर्ण एकत्र मिसळून मिश्रण तयार करावे. या मिश्रणाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करावी. काही दिवस नियमित हा उपाय केल्यास चांगला फरक पडतो. त्वचा शुष्क असेल तर रात्री काजू दुधामध्ये भिजवून ठेवावे. सकाळी भिजवलेले काजू बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती आणि मधाचे काही थेंब टाकून स्क्रब करावे.