आरोग्यानामा ऑनलाईन टीम : तुमचे जीवन भरकटल्यासारखे वाटत असेल, यशस्वी होण्याचे चान्सेस कमी वाटत असतील अथवा तुमचे जीवन तुम्हाला खास पद्धतीने बदलवून टाकण्याची इच्छा असेल तर रोज सकाळी उठल्यावर एक खास त्रिसूत्री तुम्हाला फॉलो करावी लागेल. कारण जगभरातील यशस्वी लोकांनी हेच पीसीओचे सुत्र अवलंबल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच यशस्वी जीवनाचा पीसीओ हा पासवर्ड असल्याचे म्हटले जाते.
काय आहे पीसीओ
१ पर्पज (हेतू-लक्ष्य)
२ कंट्रोल (नियंत्रण),
३ ऑप्टिमिझम (आशा-उमेद).
हे लक्षात ठेवा
१) हेतू, लक्ष्य ठरवा
सकाळी उठताच आजचा दिवस कसा जगायचा हे ठरवा. आजच्यापुरता विचार करा. आजच्या जगण्याचा हेतू शोधा. दिवस मावळेर्पयत हे ध्येय पूर्ण करण्याचा विचार करा. हे ध्येय अतिशय मोठे असण्याची गरज नाही. ते छोटे आणि सोपे असू शकते. ते पूर्ण करण्यासाठी कामाला लागा.
२) नियंत्रण
आजचा हेतू आणि ध्येय ठरले की ते करण्यासाठी तुमच्या हातात नियंत्रण घ्या. अशक्य ते सोडून द्या. त्याचा विचार करु नका. सर्व गोष्टी कागदावर लिहून कामाला लागा.
३) आशा आणि उमेद
अशावादी व्हा, उमेद बाळगा. जे काम ठरवले आहे ते कसे करायचे याचा विचार करा. हे काम पूर्ण झाले की आनंद मिळेल. जे ठरवले ते होतेच याचा अनुभव एकदा येऊ लागला की जीवन यशस्वी होतेय, असा विश्वास निर्माण होऊन आनंद मिळेल.
Visit : arogyanama.com